Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान- नागपुर येथे तंत्रफिएस्टा उत्सव.

भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान- नागपुर येथे तंत्रफिएस्टा उत्सव.


नागपुर : भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपुरच्या राष्ट्र स्तरीय वार्षिक तांत्रिक उत्सव “तंत्रफिएस्टा” च आयोजन  दि.२८ व २९ सप्टें. २०१९ रोजी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या चन्द्र्यान २ व अन्य उपक्रमांकडून प्रेरित होउन, ‘काॅन्करिंग द स्पेस’ विषयावर आधारित आहे.

ह्या उत्सवा अंतर्गत काही पूर्व कार्यक्रमांचे आयोजन गेल्या दोन आठवड्यात करण्यात आले . त्या मध्ये , जीवन ज्योती रक्तपेढी  तर्फे १५ आणि १६ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. १०० हून अधिक लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या शिबिरासाठी डॉक्टर व  परिचारिकांची विशेष टीम संस्थानात आली होती. तसच शिबिरात दंत व नेत्र तपासणी देखील मोफत करण्यात आली . तसच, दुसरा पूर्व कार्यक्रम, आयओटी कार्यशाळेचे आयोजन दिनांक २१ व २२  सप्टेंबर २०१९ रोजी करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील तृतीय वर्षीय विद्यार्थ्यांनी केले. कार्यशाळेत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एकूण १०७ विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत  सहभाग घेतला.

तंत्रफिएस्टाचा दोन दिवसीय मुख्य कार्यक्रम २८ व २९ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. ह्या उत्सवा अंतर्गत अनेक तक्निकी प्रतियोगितांच आयोजन करण्यात येणार आहे. ‘कोडिक्शन’ जी एक कोडिंग प्रतियोगिता आहे, सर्किट डिबगिंग प्रतियोगिता ‘इलक्ट्रोगीस्ट’, ‘वीव दा वेब’ वेब डिझाइनींग, व्यापार कौशल परीक्षण ‘कार्यनीति’ सारख्या अनेक प्रतियोगितांच आयोजन करण्यात आले आहे. तसच, ग्रफोमेट्री ऑनलाईन पोस्टर डिझाइनींग प्रतियोगितेचं देखील आयोजन केल्या गेल आहे.  विद्यार्थ्यांना समुपदेशन व प्रेरणा देण्यासाठी वेग-वेगळ्या विषयांवर व्याख्यानांच आयोजन केला आहे.ह्या निमित्त  श्री उमेश थोटा , ऑथबेस चे सीईओ,श्री जिग्नेश तालासिला ,लूप रियलिटी चे सीईओ व को फाउंडर आणि श्री अभय सिंह लोधी,ओमड्रोन डेवलपर्स चे उद्यमी संस्थापक व सीईओ सर्वांशी  संवाद साधणार आहे. तरी सर्व नागरिकांनी ह्याचा लाभ घ्यावा .

तंत्रफिएस्टा हा एक राष्ट्र स्तरीय मंच आहे जो विद्यार्थ्यांना आप्ल्या तांत्रिक कौशल्यांना दर्शविण्यास मदद करतो. तरी सर्व तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमात  सहभागी होउन आपली कौशल्ये सादर करावी व ह्या उत्सवचा आनंद व लाभ घ्यावा. सर्व नागरिकांना ह्या उत्सवसात आमंत्रित करण्यात येत आहे.

या उत्सवामध्ये सहभाग घेण्यकरिता नावनोंदणी (Registration) पुढील वेबसाइट वर करावी.

http://www.tantrafiesta.in तसच अन्य महितीसाठी जीविता चंदना : 7989560931 , कौटिल्या जोशी : 8989625525 , प्रिन्स पाठक : 8600183279 ह्यांच्यशी सम्पर्क साधावा.    

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *