Breaking News
Home / ॲग्रो संवाद / “कृषी संवादिनी 2022” चे थाटात विमोचन!

“कृषी संवादिनी 2022” चे थाटात विमोचन!

अकोला : जमिनीच्या पोतापासून शेतमाल बाजारपेठांपर्यंत, सुधारित पीक वाणापासून उपलब्ध संसाधनावर आधारित शेती पूरक व्यवसायापर्यंत, अनुभवाधारित काळसुसंगत संशोधनात्मक शिफ़राशी पासून कृषि प्रक्रिया उद्योगापर्यंत, पिक लागवड पद्धतीपासून अंतरमशागत, एकात्मिक पीक संरक्षण व अन्नव्यवस्थापन तंत्रज्ञानासह फायदेशीर शेतीच्या अर्थशास्त्रापर्यंत विविध हंगामी पिके, फळे, भाजीपाला  लागवड व उत्पादन तंत्रज्ञान, सुधारित पशुपालन व दुग्ध प्रक्रिया शास्त्र, अगदी सहज, साध्या शब्दात एकत्रितपणे उपलब्ध करून देणारी व्यावसायिक शेतीची ‘शास्त्रीय गाथा’ म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्‍तार शिक्षण संचालनालयाद्वारे संकलित व प्रकाशित होणाऱ्या “कृषी संवादिनी 2022″चे आज थाटात विमोचन करण्यात आले.


विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या सभेच्या निमित्ताने उपस्थित विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तथा सदस्य विधानपरिषद मा.आ.श्री.अमोलदादा मिटकरी, नुकतेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर निवड झालेले विधानपरिषदेचे सदस्य मा.आ.श्री.विप्लवजी बाजोरिया, कार्यकारी परिषद सदस्य मा. श्री. मोरेश्वरदादा वानखेडे, मा.डॉ.अर्चना बारब्दे यांच्यासह विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे, कुलसचिव डॉ.सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ नियंत्रक श्री राजीव कटारे, विस्तार शिक्षण संचालनालयातील मुख्य संपादक प्रा. संजीवकुमार सलामे,  विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

About Editor Desk

Check Also

जागतिक शांततेसाठी महत्मा गांधींचे विचार सदैव अनुकरणीय: फ्रँक इस्लाम ‘जयहिंद’च्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये 150 देशातील नागरिकांचा सहभाग.

संगमनेर : जगामध्ये वाढत चाललेली अशांतता व वर्चस्ववाद हे मानवतेला अत्यंत धोकादायक असून शांततेतूनच सर्वांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *