Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सन २०२१-२०२२ या वर्षासाठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सन २०२१-२०२२ या वर्षासाठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता

मुंबई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सन २०२१-२०२२ या वर्षासाठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी ६०० कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

या प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या बाबी जसे की शेततळे, ठिबक संच, फळबाग लागवड तसेच इलेक्ट्रिक मोटर इत्यादी तसेच शेतकरी गटांना लाभ  ( शेतीसाठी सोयीसुविधा व कृषी प्रक्रिया उद्योग) तसेच पाण्याचा ताळेबंद यावर आधारित मृद व जलसंधारणाची कामे अशा विविध बाबींचा समावेश आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प करिता बाह्यहिश्याचा रुपये चारशे वीस कोटी व राज्य हिस्साचा 180 कोटी असे एकूण 600 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात येत आहे. हा निधी पोखरा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली असतील त्यांना तात्काळ वर्ग करावा,असे स्पष्ट निर्देशही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.

हवामान बदलासाठी अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 4210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोर्‍यातील खार पण त्यातील 932 गावे असे एकूण पाच हजार 142 गावांमध्ये सहा वर्षे कालावधीत जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने रुपये चार हजार कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी सन 2021 ते 22 मध्ये एकूण 730.53 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून निधी खर्ची पडलेला आहे. 

About Editor Desk

Check Also

नविन कृषी पंप वीज जोडणी धोरणात शेतकऱ्यांना मिळाला लाभ

अमरावती : रोहित्रावर पर्याप्त क्षमता असलेल्या व लघूदाब वाहिनीपासून ३० मीटरपर्यंत अंतर असलेल्या परिमंडलातील शंभर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *