अकोला : शेतकऱ्यांसाठी नवनवीन कृषी प्रक्रिया यंत्र निर्माण करणे व ते त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज लक्षात घेऊन भाकृअनुप- अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाअंतर्गत डॉ.पंदेकृवि अकोला येथे कडधान्य मूल्यवर्धन शाखेची स्थापना करण्यात आली.
या साखळीमध्ये पीकेव्ही मिनी दाल मिल, स्क्रू पॉलिशर, पीकेव्ही क्लीनर ग्रेडर, पशुखाद्य पॅलेट मशीन, रोटरी विशिष्ट गुरुत्व विभाजक यंत्र, पापड बनविण्याचे यंत्र,बेसन मिल इत्यादी यंत्राचा समावेश आहे.कडधान्य मध्ये प्रामुख्याने तूर,हरभरा,मूग आणि उडीद या धान्यांचा समावेश होतो. सर्व कडधान्य सफाई करणे व त्यांच्यापासून विविध मूल्यवर्धन पदार्थ जसे तूर डाळ,हरभरा डाळ मूग डाळ,उडीद डाळ ,बेसन, विविध पापड व पशुखाद्य कांड्या तयार करून त्यांचे मूल्यवर्धन करणे हे साखळीचे मुख्य काम आहे. कडधान्य प्रक्रिया व त्याचे मूल्यवर्धन या महत्त्वाच्या बाबी आहेत. ज्या शेतकऱ्यांचा नफा वाढतो तसेच मालाची होणारी हाताळणी व वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी होतो अशा प्रकारच्या मूल्यवर्धन साखळी शेतकऱ्यांच्या स्थानिक जागेवर स्थापित करून त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे तसेच ग्रामीण भागातील युवकांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देऊन कडधान्य प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करून व त्यातून नवीन उद्योजक निर्माण करणे हे या कडधान्य मूल्यवर्धन शाखेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू डॉ.विकास भाले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉक्टर विलास खर्चे (संशोधन संचालक),डॉ. राजेंद्र गाडे (विस्तार शिक्षण संचालक), डॉ.सुधीर बडतरकर (डीन कृषी अभियांत्रिकी),डॉ.सुरेंद्र काळबांडे (कुलसचिव),श्रीमती रजनी लोणारे (विद्यापीठ अभियंता), श्री राजु कटारे (नियंत्रक), डॉ. प्रविण बकाने (संशोधन अभियंता, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान) व इतर विभाग प्रमुख प्राध्यापक यांच्या उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रमोद बकाने, संशोधन अभियंता व त्यांचे सहा. कर्मचारीवृंद,कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान यांचे सहकार्य लाभले.