नागपूर : महाराष्ट्र मत्स्य व विज्ञान विद्यापीठांतर्गत अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी ता. कळमेश्वर, जि. नागपूरच्या वतीने ग्राम पंचायत कनीयाडोल, ता. कळमेश्वर, जिल्हा नागपूर येथे ‘बोर्डो मलम’ प्रात्यक्षिक आयोजन प्रा. डॉ. अनिल भिकाने संचालक, विस्तार शिक्षण, मपमविवि आणि डॉ. सारीपुत लांडगे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.
डॉ. अमोल हरणे, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) यांनी प्रात्यक्षिकमध्ये शेतकऱ्यांना बोर्डो मलम(पेस्ट) आधुनिक पद्धतीने बनवण्याची पद्धत सांगितली. यामध्ये १०लिटर पाण्यात १ किलो चुना + १ किलो मोरचुद + २० मिली किटकनाशक (क्लोरीपॉरिफोस किवा डायक्लोरोवोस) टाकावे. या पद्धतीमुळे बोर्डो पेस्ट बरोबर कीटकनाशक वापरल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होऊ शकतो.
या पद्धतीमूळे बुरशीजन्य रोगांचे व किडींचे नियंत्रण करता येते. जसे की ,संत्र्यावरील डींक्या रोगाचे तसेच साल खाणाऱ्या अळीचे व वाळवी या किडीचे व्यवस्थापन करता येते. त्याचप्रमाणे बोर्डो मलम करतांना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकमध्ये २० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अश्विनी गायधनी (विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या) श्री. तुषार मेश्राम (विषय विशेषज्ञ, कृषी विस्तार), मयुरी ठोंबरे (विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान) आणि श्री. विजय ठाकरे यांनी परिश्रम घेतले.