Breaking News
Home / कोणासाठी व कशासाठी?

कोणासाठी व कशासाठी?

शेतकर्‍यांचा पेपर अशी बिरुदावली घेवून आम्ही ” अ‍ॅग्रो टाइम्स “   माय-बाप वाचकांकरीता सुरु करीत आहोत. महाराष्ट्र पूर्वापार कृषीची भूमि होय, महाराष्ट्रातील हवामान, पाणी माती यात कमालीची वैविध्यता आढळते.त्यामुळेच पूर्णान्न शेती महाराष्ट्रात होते की ज्यामुळे महाराष्ट्राचे देशात महत्वाचे स्थान आहे.

आज जग वेगाने बदलतं असतांना बदलाचे वारे प्रत्येक क्षेत्रात वाहत आहे. कृषी हे महत्वाचे क्षेत्र असून शेतात राबणारे हातचं काय तर संपूर्ण पिढीचं बदलत आहे. या क्षेत्रात येणारे नव-नवीन तंत्रज्ञान, नवे येवू पाहणारे शेतकरी व वर्तमानातील शेतकरी या सर्वांची नाळ आम्ही  “अ‍ॅग्रो टाइम्स” च्या  माध्यमातून जोडणार आहोत.

माणासाला भाषा आणि प्रदेश असतो पण ज्ञानाला, कौशल्याला तो नसतो. जगता जे – जे उत्तम आहे ते सारे ” अ‍ॅग्रो टाइम्स “ थेट आमच्या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवेल . ग्रामीण समाजात, कृषी क्षेत्रात स्त्रियांचे योगदान अमुल्य आहे; या मातृशक्तीला सलाम करुन अधिकाधिक सक्षमीकरणावर आमचा भर असणार आहे.

” अ‍ॅग्रो टाइम्स “ आज आपणासर्वांना विश्‍वास देवू ईच्छिते की जगात प्रत्येक क्षेत्रात मंदी येते परंतू निसर्गाने योग्य साथ दिली आणि शेतकर्‍यांची होणारी मेहनत -शेती या क्षेत्रात  कधी मंदी येवू देणार नाही, तेव्ही युवकांनो शेतकडे वळा.

महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतातील सण,उत्सव हे शेतीच्या वेळा पत्रकाशी जोडले आहे. तेव्हा ” अ‍ॅग्रो टाइम्स “ च्या माध्यमातून या सण उत्सवाला द्विगुणीत करण्याचे कार्य घडो हिच इशचरणी प्रार्थना.

चला जागे होऊ या, सज्ज होऊ या दिर्घ पल्ल्याच्या लढ्यासाठी हा लढा आपण जिकूंच या निर्धारासह.