Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे शेतकऱ्यांकरिता तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे शेतकऱ्यांकरिता तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे शेतकऱ्यांकरिता तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ ते ७ नोव्हेंबर २०१९ दरम्यान विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे आयोजित करण्यात येणार आहे.

दररोज सकाळी शिवारफेरी (प्रक्षेत्र भेटी) आणि दररोज दुपारी ४ ते ५ पर्यंत कृषी महाविद्यालयाचे डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येईल. शिवारफेरी करिता आलेल्या शेतकऱ्यांना सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत शेतकरी सदन येथे नाममात्र शुल्क १०/- रुपये भरून नोंदणी करणे आवश्यक राहील नोंदणीच्या वेळी शेतकर्‍यांनी चहा-नाश्ता -जेवण्याची कुपने वितरित केल्या जातील.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना विद्यापीठ परिसरामध्ये प्रक्षेत्र भेटी करिता ठरविण्यात आलेली ठिकाणी जाण्याकरिता वाहन तसेच मार्गदर्शक यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विद्यापीठजवळ वाहतूक साधने मर्यादित असल्याने याबाबत शेतकऱ्यांनी विद्यापीठात सहकार्य करण्याची विनंती विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण यांनी केले आहे. शेतकऱ्यांची एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून जिल्हानिहाय कार्यक्रम सुनिश्चित करण्यात आला असून,त्या दिवशी त्या जिल्ह्याकरिता शेतकऱ्यांनी व्यक्तिशः व समूहाणे यावे. समस्त शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की, शिवार फेरीमध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे इतर शेतकऱ्यांना सुद्धा शिवारफेरी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे, अशी विनंती विद्यापीठाच्या वतीने करण्यात येत आहे. 

शिवार फेरीचे उद्घाटन दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजता शेतकरी सदन येथे होईल समूहाने सहभागी होणाऱ्या शेतकर्‍यांनी पूर्व सूचना दिल्यास सोयीचे होईल ( निशुल्क सेवा क्रमांक 18002330724). नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रक्षेत्र भेटी साठी नेण्यात येईल.यात प्रामुख्याने सेंद्रिय शेती,उद्यानविद्या विभाग,कापूस संशोधन केंद्र,संशोधन प्रकल्प,ज्वारी संशोधन केंद्र, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, कडधान्य संशोधन केंद्र,तेलबिया संशोधन केंद्र,डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र,कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय येथे अवजार प्रदर्शनी,नागार्जुन वनौषधी उद्याने व दुग्धशास्त्र विभाग येथे देशी गाय क्षेत्रास भेटी देण्यात येईल.तरी शेतकरी बंधू भगिनींनी या शिवार फेरीमध्ये सहभागी होऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा अशी विनंती डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक,विस्तार शिक्षण-डॉ.दीपक मानकर यांनी केली आहे.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *