Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / सापळा पिके म्हणजे काय ? सापळा पीक वापरण्याची तत्वे

सापळा पिके म्हणजे काय ? सापळा पीक वापरण्याची तत्वे

साभार : होय आम्ही शेतकरी समूह

सापळा पीक वापरण्याची तत्वे :
१. सापळा पीक हे मुख्य पिकाच्या जीवनकाळात  सुरवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे. मुख्य पिकाला त्यापासून अन्नद्रव्य, पाणी, जागा व प्रकाश या बाबतीत कमीतकमी स्पर्धा असावी.२. सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. त्याच सोबत  सापळा पिकावरील किडींचे अंडीपुंज,अळ्या, कोष आणि प्रौढ अवस्था गोळा करून नष्ट कराव्यात.
एकात्मिक शेती पद्धतीमध्ये खालील सापळा पिके शेतकर्यांनी आवर्जून करावीत.

कापूस या पिकाभोवती पिवळ्या रंगाच्या झेंडूची एक “बॉर्डर लाइन’ लावून घ्यावी. झेंडूच्या पिवळ्या फुलांकडे हिरव्या बोंड अळीचा मादी पतंग आकर्षित होऊन त्यावर अंडी घालतो तसेच झेंडूच्या मुळामधून हानिकारक “अल्फा टर्थिनील’ (Alfa-terthienyl) हे रसायन स्रवते त्यामुळे सूत्रकृमींचे नियंत्रण होण्यास मदत होते. त्याच सोबत सनासुधीच्या काळात या फुलांपासून  जास्तीचे उत्पन्न मिळू शकते. त्याच बरोबर कापसाभोबाती भोवती एक ओळ एरंडी या सापळा पिकाची “बॉर्डर लाइन’ घेतल्यास तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा व उंटअळीचा मादी पतंग एरंडीच्या मोठ्या पानावर अंडी घालतो. अशी अंडीपुंज व अळ्या वेचून नष्ठ केल्यास मुख्य पिकाचे संरक्षण होते. कपाशीमध्ये मुग चावली मका यासारखी इके घेतल्यास नैसर्गिकरीत्या मित्राकीटकांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. 

सोयाबीन पिकात तंबाखूवरील पाने खाणारी अळी(स्पोडोप्टेरा लिट्युरा), केसाळ अळी, विविध उंट अळ्या आदींचा प्रादुर्भाव दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात होतो. या सर्वप्रकारच्या अळ्याचे भविष्यात नियंत्रण करण्यासाठी सोयाबीन पेरणीपूर्व शेताच्या चारी बाजूने एरंड, जोठ्रोफा ज्वारी या पिकांची  लागवड करून घ्यावी. त्यामुळे ह्या अळ्या सापळा पिकाकडे आकर्षित होतात. या अळ्या जैविक किंवा फवारणी करून नियंत्रित करता येतात.

भुईमूग पिकात शेताच्या चारी बाजूने सूर्यफुल या पिकाची “बॉर्डर लाइन’म्हणून लागवड करावी. भुईमुगावर येणारी केसाळ अळी, स्पोडोप्टेरा व घाटेअळी या सर्व किडी सर्वप्रथम सूर्यफुलाची मोठी पाने व पिवळ्या रंगाच्या फुलांकडे आकर्षित होऊन अंडी घालतात. सूर्यफुलावरील अंडीपुंज प्रादुर्भावग्रस्त पाने अळ्यांसहित नष्ट करावीत किंवा त्यावर जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी जेणेकरून ती कीड मुख्य पिकास हानी पोहचवणार नाही..

तूर सलग पेरणीसाठी तुरीच्या बियाण्यात ज्वारी अथवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करावी. ज्वारी आणि बाजरी दाने भरण्याच्या काळात असताना त्याच्यवर मित्रपक्षी आकर्षित होतील. या काळात जर  शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव असेल तर तिचे नियंत्रण होईल.

टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी आणि वांगी,मिरची,भेंडी, टोमॅटोमधील  सूत्रकृमींच्या नियंत्रणाकरिता या पिकांच्या “बॉर्डर लाइन’ने मुख्य पिकाच्या अंतरानुसार झेंडूची एक ओळ सापळा पीक म्हणून लागवड करावी.डॉ . अंकुश चोरमुले
कीटकशास्त्रज्ञ -प्रबंधक -होय आम्ही शेतकरी समूह
८२७५३९१७३१

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *