Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी लाईव्ह वॉर रूम कार्यान्वित करावी – शिक्षण मंचची मागणी

विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी लाईव्ह वॉर रूम कार्यान्वित करावी – शिक्षण मंचची मागणी

अमरावती : विद्यापीठच्या उन्हाळी २०२० ऑनलाईन परीक्षा दिनांक २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशीच्या ऑनलाईन परीक्षा संचालनाचा अनुभव पाहता, प्रत्यक्ष परीक्षा देतांना विद्यार्थ्यांना अनंत अडचणी आल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी विद्यापिठाद्वारा पुरविण्यात आलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करता आला नाही. सदर क्रमांक अक्षरश: बंद असल्याचा अनुभव आला. अश्या युद्धस्वरूप परिस्थितीत मदतीसाठी उभारण्यात आलेली व्यवस्था पुर्णतः कोलमडून पडल्याची अनुभूती आली. 

यावेळी दिशा मार्गदर्शन मंचच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान सुचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंचने विद्यापीठास निवेदन सादर केले की, अमरावती विद्यापीठाच्या सर्व परीक्षार्थींना प्रत्यक्ष विद्यापीठाच्या स्तरावर काय अडचण आहे? उद्भवलेली समस्या त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर आहे? अथवा विद्यापीठाच्या अॅपमध्ये अडचण आहे? कुठल्या परीक्षा सुरु झाल्या? कुठल्या टप्प्यावर अडचण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना वेळेत मिळाली तर असंतोष कमी करता येईल व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पोषक वातावरण मिळेल. याकरिता विद्यापीठास पुढील प्रस्ताव सुचविण्यात आले. त्यामध्ये विद्यापीठाने ऑनलाईन लाईव्ह डॅश बोर्ड तयार करून वेळापत्रकानुसार विषयनिहाय स्थिती स्पष्ट करणारा चार्ट संकेतस्थळावर प्रकाशित करावा असे सुचविण्यात आले.

सॉफ्टवेअर तज्ञ आणि प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांची फळी युट्युब किंवा संकेतस्थळावरून थेट प्रसारणाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि महाविद्यालयांच्या अडचणींना समाधानकारक उपाययोजना सुचविण्यासाठी उपलब्ध असावी अशी सूचना करण्यात आली. तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील जिल्हानिहाय अनुभवी व संगणक जाणकार प्राध्यापक ऑनलाईन परीक्षेमध्ये विदयार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विद्यापीठाने प्राधिकृत करावे अशी विनंती करण्यात आली.

विद्यापीठ, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी या सर्व कार्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच अंतर्गत कार्यरत “दिशा : विद्यार्थी मार्गदर्शन मंच” मदतीचा हात पुढे असल्याचा पुनरुच्चार करीत संघटनेचे अध्यक्ष प्रा प्रदीप खेडकर यांनी विद्यापीठाने या निवेदनाचा सकारात्मक विचार करून पुढे उदभवणाऱ्या अडचणीचा सामना करण्यासाठी शिक्षकांची मदत घ्यावी असे आवाहन केले आहे.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *