मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे माळढोक आणि तनमोर या दुर्मिळ पक्षांचे अधिवास विकासासाठी नान्नज (सोलापूर), वरोरा (चंद्रपूर) व अकोला वन विभागासाठी 63 लाख रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
माळढोक आणि तनमोर हे पक्षी दुर्मिळ व संकटग्रस्त झाले असून या पक्षांच्या अधिवास विकासासाठी विभागाकडून सन 2020-21 या वर्षासाठी 1.25 कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा तयार केला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने 63 लाख रुपयांचा पहिला हप्ता वितरित केला आहे. या पक्षांच्या अधिवास विकासासाठी वन विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहितीही वन मंत्र्यांनी दिली.