Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / परळी औष्णिक विद्युत केंद्रातील गैरव्यवहारप्रकरणी चौकशीचे आदेश

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील गैरव्यवहारप्रकरणी चौकशीचे आदेश

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अंतर्गत बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक विद्युत केंद्रात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विधानपरिषदेत दिली..

विधानपरिषदेत आमदार संजय दौंड यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रातील गैरव्यवहारप्रकरणी लक्षवेधी उपस्थित करून चौकशी करण्याची मागणी केली होती, त्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर दिले. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी व मे. रिशू किचू प्रा.लिमिटेड कंपनी  यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा अपहार, फसवणूक व गैरव्यवहाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी महानिर्मिती कंपनीच्या मुख्यालय स्तरावरून संचालक (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यांचा अहवाल 1 महिन्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या निविदा प्रक्रियेच्या संदर्भात बीडच्या परळी येथील थर्मल पॉवर कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर्स असोसिएशनने औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे श्री. राऊत यांनी यावेळी सांगितले.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *