Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / सेमिनार कॉम्पिटीशनमध्ये शिवाजी विज्ञान महाविद्यालय प्रथम – अमरावती युनिव्हर्सिटी केमिस्ट्री टिचर्स असोसीएशनचे आयोजन

सेमिनार कॉम्पिटीशनमध्ये शिवाजी विज्ञान महाविद्यालय प्रथम – अमरावती युनिव्हर्सिटी केमिस्ट्री टिचर्स असोसीएशनचे आयोजन

अमरावती :अमरावती युनिव्हर्सिटी केमिस्ट्री टिचर्स असोसीएशनद्वारा आयोजित सेमिनार कॉम्पिटिशनमध्ये अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.कोमल जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात तिचा बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला.

अमरावती युनिव्हर्सिटी केमिस्ट्री टिचर्स असोसीएशनद्वारा दरवर्षी रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिनार स्पर्धा आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रातील नव्या बदलांसह त्यांच्यातील शैक्षणिक गुणवत्तेत सुधार घडवून आणण्याच्या उद्देश्याने या स्पर्धेत अमरावती विभागातील विविध महाविद्यालयातील पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात रसायनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी दिली जाते. यावर्षी देखील मोठ्या संख्येने अमरावती विभागातील महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभागी घेतला होता. या स्पर्धेचे उद्धाटन अमरावती युनिव्हर्सिटी केमिस्ट्री टिचर्स असोसीएशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पी.आर.राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उच्च शिक्षण संचालक डॉ.के.एम.कुलकर्णी यांच्यासह प्राचार्य डॉ.ए.पी.चर्जन, विभागप्रमुख डॉ.डी.पी.दुपारे, असोसीएशचे सहसचिव डॉ.के.एन.पुरी आदींची उपस्थिती होती.

या स्पर्धेत स्पर्धकांनी इलेक्ट्रॉनिक स्पीन रेसोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी या विषयावरील सेमिनारचे सादरीकरण केले. यामध्ये श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.कोमल जोशी हिने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच द्वितीय स्थान कारंजा लाड येथील इन्नानी महाविद्यालयातील कु.मेघा कोटक आणि तृतीय स्थान अमरावती येथील शासकीय ज्ञान व विज्ञान संस्थेची कु.पलक भट्टड हिने पटकावले. सर्व बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना बक्षिसे तसेच प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ.प्रवीण बोडखे, डॉ. एम.डब्ल्यू.भडे,  डॉ.व्ही.डी.माने,  विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *