Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / * संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच चे अध्यक्ष प्रा प्रदीप खेडकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड *

* संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच चे अध्यक्ष प्रा प्रदीप खेडकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड *

अमरावती :अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणीची बैठक  औरंगाबाद  येथे नुकतीच पार पडली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षिक संघाद्वारा हे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ स्तरावरील राजकारणात नवा अध्याय रचणारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण अध्यक्ष प्रा प्रदीप खेडकर यांची अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. राज्यस्तरावर महत्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉ ए पी कुळकर्णी, डॉ. शेखर चंद्रात्रे, डॉ. प्रभुजी देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हि बैठक पार पडली. 

प्राध्यापकांना वेतन आयोगाच्या किंवा निवडणुकांच्या निमित्ताने एकत्रित आणून उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेला मारक ठरणारे,  संपूर्ण शिक्षण प्रणालीचा बट्ट्याबोळ करणाऱ्या राजकारणामुळे उद्विग्न झालेल्या तरुण प्राध्यापक व समाजापुढे नवा आदर्श निर्माण करण्याचे काम मागील काळात प्रा खेडकरांनी धडाडीने पार पाडले. राजकारणाच्या एककल्ली कार्यक्रमाला तिलांजली देऊन शिक्षकांच्या शैक्षणिक, अध्यापन व सामाजिक प्रगतीस पोषक वातावरण निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेवून नवीन दिशा चोखंदळणाऱ्या राजकारणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम यापासून ते एकरूप परिनियम किंवा अभासमंडळांच्या कार्यप्रणाली पर्यंत प्रत्येक बाबतीत सर्व प्राध्यापकांनी अभ्यास करावा व आपला उत्कर्ष साधावा या भूमिकेतून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करीत राजकीय आखाड्यात दंड थोपटून प्राध्यापकांच्या नव्या पिढीचे नेतृत्व त्यांनी केले. प्राध्यापक भगिनींच्या नेतृत्व गुणांना साद देत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा हातात हात घेत आपला प्रत्येक शिक्षक स्वयंभू नेता व्हावा आणि कुण्या एका नेत्याच्या दयाभावनेवर विसंबून राहण्याची त्याला गरज पडू नये या प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा करून राजकीय दृष्ट्या नविन परिमाणे विकसित केली. 

या सर्व भगीरथ प्रयत्नांचे सार्थक व्हावे व संपूर्ण महाराष्ट्राने राजकारणाची ही नवी कास धरावी या भावनेने अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी नेतृत्वाची धुरा बिनविरोध प्रा. प्रदीप खेडकर यांच्या हाती सोपवण्यात आली. 

अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रात अवलंबिली कार्यपद्धती संपूर्ण महाराष्ट्रात पसरावी आणि उच्च शिक्षण क्षेत्रात नव्या राजकीय वातावरणाची निर्मिती व्हावी यासाठी या नेतृत्वावर एकमुखाने विश्वास दर्शवून महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा प्रदीप खेडकर यांना हे राज्यव्यापी दायित्व दिले. महामंत्री पदी मुंबईचे डॉ. वैभव नरवडे, उपाध्यक्ष म्हणून जळगावचे (खा.) डॉ. नितीन बारी, उपाध्यक्ष पदासाठी औरंगाबादचे डॉ पंढरीनाथ रोकडे आणि सहमंत्रीपदी नागपूर येथील डॉ संजीव दुधे यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे डॉ ए पी कुळकर्णी, पुणे डॉ. शेखर चंद्रात्रे, मुंबई आणि डॉ. प्रभुजी देशपांडे नागपुर यांच्याकडे समन्वयक म्हणून कार्यभार देण्यात आला. 
या नवीन जबाबदारीसाठी सर्व स्तरातून नवनियुक्त अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर  यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सभेसाठी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांमध्ये कार्य करणाऱ्या शैक्षिक महासंघाच्या संलग्नित संघटनांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.

शासन, प्रशासन, विद्यापीठ, संस्था आणि महाविद्यालयांचा समन्वय साधून प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याचे अमरावती विद्यापीठाचे मॉडेल राज्यभरात पोहोचविण्यासाठी विशेष कार्यपद्धती विकसित करून विद्यार्थी केंद्रित आणि प्राध्यापकांच्या व्यवसायिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. राज्यव्यापी दौरे करून प्रत्येक विद्यापीठातील जास्तीत जास्त उच्च शिक्षण क्षेत्रातील घटकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेणे व त्यावर तत्काळ प्रभावी उपाययोजना करणे या कामास प्राथमिकता देणार – *प्रा. प्रदीप खेडकर*

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *