Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन 17 रोजी

विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन 17 रोजी

अमरावती : हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देऊन विणकरांना गौरविण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. याअनुषंगाने विभागीय हातमाग कापड स्पर्धा 2019-20 चे आयोजन दि. 17 मार्च, 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता विभागीय आयुक्त (महसुल) नागपूर यांचे कार्यालयाचे सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.

अमरावती आणि नागपूर विभागातील सर्व हातमाग विणकरांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले असून अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय किंवा प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर यांचे कार्यालयास 0721-2537927 या क्रमांकावर संपर्क साधावा असे स. ल. भोसले, प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग नागपूर तथा सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *