Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / अनूसूचित जमातींच्या विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षा वर्गाचे आयोजन

अनूसूचित जमातींच्या विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षा वर्गाचे आयोजन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दहा महिने कालावधीचे अनिवासीय स्पर्धा परीक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. विहीत पात्रता धारण करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दिनांक 15 मार्च 2020 पर्यंत सादर करावे लागतील.

या वर्गाचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, विद्यार्थी पदवी किंवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाला प्रवेश घेतलेला असावा यासाठी पुरावा सोबत जोडावा, या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न दोन लाखा पेक्षा जास्त नसावे, अर्जामध्ये खोटी माहिती सादर केल्याससंबंधिताचा प्रवेश रद्द करण्यात येईल, विद्यार्थ्यांनी आापले अर्ज गृहप्रमुख, आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र.3 राणा टर्मिनन्स, जिवनज्योती कॉलनी, जुना बायपास, दस्तूर नगर, अमरावती, या पत्त्यावर पाठवावे,असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी च्या सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, यांनी कळविले आहे.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *