Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / प्रश्नमंजुषा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी हितकारक ! डॉ.किशोर पुरी

प्रश्नमंजुषा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी हितकारक ! डॉ.किशोर पुरी

अमरावती : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नेट-सेट सारख्या स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाण्यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेसारखे उपक्रम संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ रसायनशास्त्र अध्यापक संघामार्फत राबविले जात असून ते विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हितकारक असल्याचे प्रतिपादन संघाचे सहसचिव डॉ.किशोर पुरी यांनी केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ रसायनशास्त्र अध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शीटाकळी येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर पवार होते. यावेळी प्रा.पी.पी.देवहाते, जिल्हा समन्वयक डॉ.थोरात आदींची उपस्थिती होती. विद्यापीठ स्तरावरील ही प्रश्नमंजुषा विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्यात ज्ञानवृद्धी करण्याचे उत्तम माध्यम असल्याचे डॉ.पुरी यावेळी बोलताना म्हणाले. या स्पर्धेत प्रथम स्थान पटकावलेल्या यवतमाळ येथील अमोलोकचंद महाविद्यालयाच्या चमुचा यावेळी बक्षिस तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच द्वितीय स्थान पटकावलेल्या रा.शा.महाविद्यालय चांदूर रेल्वे, तृतीय स्थान पटकावलेल्या इन्नानी महाविद्यालय कारंजा लाड यांचा देखील यावेळी बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जी.एस.महाविद्यालय खामगावला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. 

या स्पर्धेत डॉ.एस.जी.बदने तसेच डॉ.पी.आर.कावळे यांनी परीक्षक म्हणून भुमिका निभावली. या उपक्रमासाठी प्रा.ए.बी.पाटील, डॉ.डब्ल्यू.एस. सुरडकर, डॉ.वी.एस.उंडाल यांचे विशेष सहयोग लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.मसतकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.एस.ए.वाघमारे यांनी केले. या उपक्रमासाठी डॉ.ए.पी.वैराळे, डॉ.एन.एम.कंकाळे, डॉ.ए.एस.श्रीराव, डॉ.पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *