Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / मांदियाळी १९ चे ना. गडकरींच्या हस्ते विमोचन 

मांदियाळी १९ चे ना. गडकरींच्या हस्ते विमोचन 

नागपूर : कलासंगम या सांस्कृतिक आणि सामाजिक भान जपणाऱ्या संस्थेने दरवर्षी प्रमाणे सर्वसमावेशक दिवाळी अंक काढून आपल्या स्वतंत्र वाटचालीत साहित्य आणि कलेचे मुक्त दालन रसिकांना उपलब्ध करून दिलेले आहे. 

धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते मांदियाळी या कलासंगमच्या दिवाळी अंकांचे विमोचन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्वा .सावरकर समितीचे अध्यक्ष अरुण जोशी,न्यूरॉन हॉस्पिटल चे संचालोक डॉ. पाखमोडे ,मांदियाळी अंकाचे संपादक राजेंद्र नाईकवाडे,स्मिता खंगई,रवी डोके,संदीप वाघ तसेच कलासंगम चे अध्यक्ष अमर आकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

नागपूरकर कला रसिकांची वाचनसंस्कृती जपणारी एक अग्रणी संस्था म्हणून कलासंगम कार्यरत आहे आहे हा दिवाळी अंक म्हणजेच कलासंगम  कार्याची पावती होय अश्या शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांनी कलासंगम च्या कार्यगुणांचे गुणगान करीत अंकाला शुभेच्छा दिल्या. 

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *