Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / निसर्गाशी संवाद साधत “ शाश्वत शेती विकास आणि पर्यावरण पूरक गांव ”

निसर्गाशी संवाद साधत “ शाश्वत शेती विकास आणि पर्यावरण पूरक गांव ”

विजय औताडे -ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ – सातारा

शेती मध्ये वापरात येणारे प्रचंड रासायनिक खत तसेच सेंद्रिय खत आणि वारंवार एकाच प्रकारच्या उत्पादनामुळे शेताचे आणि जमिनीचे होणारे अपरिमित नुकसान. शेत जमिनीची गुणवत्ता योग्य राहण्यासाठी जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक घटक याचे संतुलन राखण्यासाठी अनेक उपाय योजना करणे गरजेचे आहे. किंबुहुना निव्वळ आपल्या फायद्यासाठी आपण आपल्या  मातृ-तुल्य धरतीवर म्हणजे शेतावर अनेक प्रकारचे प्रयोग करून शेती उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. जमिनीतील घटकांचे सूक्ष्म विघटन प्रक्रिया नैसर्गिक अवस्थेमध्ये राहण्यासाठी प्राचीन काळापासून विविध प्रकारचे  उत्पादन घेऊन जमिनीचा पोत राखण्यासाठी वेगवेगळी पिके घेतली जात असत. यामुळे जमिनीची गुणवत्ता अखंड राहण्यासाठी खूप मदत होत असे. काळाच्या ओघात नवीन शेतकरी बांधव पारंपारिक शेती प्रक्रिया विसरून नवीन नवीन प्रयोग करून शेती उत्पादन वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाय योजना करत असतात. परंतु जमिनीची नैसर्गिक रचना तसेच घटक आणि पारंपारिक उत्पादन हे त्या विभागात मोडणाऱ्या वेगवेगळ्या जमिनीच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे.

आपल्या सामान्य जीवनात उपयोगी येणारी अनेक पिके आज नष्ठ झाली आहेत. किंवा नगद पिकाच्या मागे लागून शेतकरी बांधव आपल्या रोजच्या जीवनात लागणारी अन्न धान्ये निर्मिती करत नाहीत त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. आपल्याला दैनदिन जीवनात उपयोगी असणाऱ्या पालेभाज्या, कडधान्ये उत्पादन करण्याचे सोडून उस , हळद, आले, किंवा ज्या पिकांना खूप मोठ्या प्रमाणात पाणी, रासायनिक खते, सेंद्रिय खत लागते अश्या पिकांची लागवड झाल्यामुळे विविध भागात नैसर्गिक समतोल तसेच शेत जमीनीचे नुकसान होते किंबुहुना याला आपण शेतीचे प्रदूषण झाले म्हणणे योग्य ठरेल.

माझी सर्व शेतकरी बांधवाना एक नम्र विनंती आहे कि शेत जमिनीचे होणारे संभाव्य प्रदूषण टाळण्यासाठी खालील उपाय योजना करणे आपल्याला भविष्य काळात वरदान ठरेल.

  • जमिनीची रासायनिक तसेच भौतिक गुणधर्म पडताळणी करणे.
  • साधारण शेताला वेगवेगळ्या पिका साठी लागणारे योग्य पाणी प्रमाण पाहणी करणे.
  • पिकाची अदला बदल करून योग्य संतुलन ठेवणे.
  • शक्यतो पिकासाठी लागणारे याची नोंद ठेवणे.
  • रासायनिक खतांचा वापर शक्यतो टाळणे.
  • पशु धन वापर करावा : गायी , म्हैस , बैल , शेळी, कोंबड्या इत्यादी.
  • गावात निर्माण होणारे सांडपाणी शोष खड्यात प्रक्रिया करून पुढे साठवून त्याचा वापर शेती किंवा गायरानात करावा.
  • सार्वजनिक उपक्रमातून गावात असणाऱ्या गायरान किंवा मोकळ्या जमिनीत त्या वातावरणात जगणारी झाडे लावावीत ( साधारण एकरी ६०० झाडे लावता येवू शकतात) .
  • गावात असणाऱ्या जुन्या विहिरी, नाले, ओढे, नदी इत्यादी यामधील गाळ माती काढून मुजलेले नैसर्गिक झरे पुनर्जीवित करणे.

१०.प्लास्टिक वापर टाळणे. ज्या ठिकाणी शक्य आहे त्याठिकाणी पावसाच्या          प्रत्येक थेंबाचे साठवण करून पाणी जमिनीत मुरले जाईल यासाठी गावपातळीवर जनजागृती करावी.

११. गावात निर्माण होणारा सुका आणि ओला कचरा याचा खत निर्मिती किंवा जमिनी मध्ये पुनर्भरण करण्यासाठी उपयोगात आणावा.

१२. गाव पातळीवर शास्वत नैसर्गिक विकास , पर्यावरण पूरक उपाय योजना याबाबत नियमवाली धोरण आखून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे.

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *