Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / ग्रामिण युवक-यूवतींसाठी रोजगारभिमूख प्रशिक्षण

ग्रामिण युवक-यूवतींसाठी रोजगारभिमूख प्रशिक्षण

अमरावती : ग्रामिण अल्पशिक्षित युवक व युवतींना स्वयंरोजगार मिळावा यासाठी तांत्रिक कौशल्यावर आधारीत रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनर दुरुस्ती करण्याबाबत सहा महिने कालावधींचे निशुल्क प्रशिक्षण शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्रालय, केंद्रिय प्रशिक्षण संचलनालय, अंतर्गत कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलिटेक्निक या योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज योजनेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असून मुलाखत पध्दतीने प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येईल. प्रशिक्षणाबाबत माहितीसाठी कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पालीटेक्निक योजना कार्यालय, मुलींचे वसतीगृह समोर,शासकीय तंत्रनिकेतन परीसर गाडगे नगर, अमरावती येथे संपर्क साधावा असे, संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.पी. मोगरे व योजनेचे समन्वयक प्रा.एस..जे. गायकवाड यांनी कळविले आहे.

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *