Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / ‘आपलं मंत्रालय’चा निवडणूक विशेषांक प्रकाशित मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह अंकाचे अतिथी संपादक

‘आपलं मंत्रालय’चा निवडणूक विशेषांक प्रकाशित मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह अंकाचे अतिथी संपादक

मुंबई : ‘आपलं मंत्रालय’च्या सप्टेंबरच्या ‘विधानसभा निवडणूक 2019’च्या विशेषांकाचे प्रकाशन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्या हस्ते आज येथे झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (वृत्त/माहिती) सुरेश वांदिले, सायबर सेलचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकांचे औचित्य साधून प्रसिध्द करण्यात आलेल्या या विशेषांकात निवडणूक विषयक विविध माहितीपूर्ण लेखांचा समावेश आहे. आचारसंहिता म्हणजे काय, आचारसंहिता काळात घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करू नये, निवडणूकीतील सोशल मीडिया, सी-व्हिजील अॅप, निवडणूक चिन्ह, निवडणूकीत वापरली जाणारी शाई, घ्यावयाची खबरदारी, जनजागृती मोहीम, निवडणूक प्रक्रिया याबाबतच्या माहितीपूर्ण लेखांचा यात समावेश आहे.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *