Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / मुंबई जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ८ जानेवारी पर्यंत अर्ज करावेत

मुंबई जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ८ जानेवारी पर्यंत अर्ज करावेत

 मुंबई : जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे आणि योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून  जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. सन २०१९-२० च्या मुंबई शहर जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ८ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.

            मुंबई शहर जिल्ह्यातील पुरस्कारासाठी प्राप्त क्रीडा व खेळ प्रकारातील गुणवंत क्रीडापटू (एक पुरूष/ एक महिला व एक दिव्यांग खेळाडू),  गुणवंत मार्गदर्शक यांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा संकुल, २ रा मजला, सायन – बांद्रा लिंक रोड, धारावी बस डेपो शेजारी, धारावी, सायन (प), मुंबई येथून विनामुल्य प्राप्त करून घ्यावेत.

            या पुरस्कारासाठीचे  विहित नमुन्यातील अर्ज ८ जानेवारी २०२१ पर्यंत  कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर (दुरध्वनी क्रमांक ९८१९७०२०७०, ९७५७०१४५३७ येथे संपर्क साधाव, असे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *