Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / अमरावती परिमंडळातील १८३ अभियंते व कर्मचाऱ्यांचा गौरव

अमरावती परिमंडळातील १८३ अभियंते व कर्मचाऱ्यांचा गौरव

यवतमाळ :राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त राज्यासह अमरावती परिमंडळात लॉकडाऊन नंतर निर्माण झालेल्या संपूर्ण बंदच्या आणि आता अनलॉकच्या काळात विजेसारख्या अत्यावशक सेवा श्रेत्रात दिलेले योगदान तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याची उध्वस्त झालेली महावितरणची यंत्रणा पुर्ववत  करण्यासाठी पेन येथे जाऊन दिलेल्या महत्वपुर्ण योगदानाबद्दल अमरावती परिमंडळातील अभियंते,तांत्रिक व अतांत्रिक वर्गवारितील १८३ कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.

कोरोनाचे भय अजून संपले नसल्याने १८३ कर्मचाऱ्यांचा सन्मान हा एकाच ठिकाणी न करता शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या नियम व अटीच्या अधिन राहून सामाजिक दुरीचे अंतर ठेवले जावे यासाठी हा सन्मान अमरावती परिमंडळ कार्यालय,तसेच जिल्ह्यातील चार विभाग तसेच यवतमाळ जिल्ह्यातील तीन विभागात कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार विभागून करण्यात आले.यावेळी सर्व पुरस्कृत कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्राने सन्मानित करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून शासनातर्फे संपूर्ण लॉकडाऊन आणि आता अनलॉकच्या परिस्थितीचा  दैनंदिन जनजीवन व कामकाजावर फार मोठे परिणाम झाले. या काळात सामाजिक शांतता ठेवण्याच्या दृष्टिने ग्राहकांना अखंडित वीज सेवा देण्याची मोठी जबाबदारी महावितरणवर असतांना  कोरोनाच्या धोकादायक स्थितीतही नियमित कार्यालयात येऊन दिलेले जबाबदारीत उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या तसेच निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याची उध्वस्त झालेली महावितरणची यंत्रणा पुर्ववत करण्यासाठी महावितरणच्या आदेशानुसार कोरोनाच्या बिकट परिस्थितही पेन येथे जाऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना हे प्रशस्ती पत्रक  देण्यात आले.

परिमंडळातून रायगड जिल्ह्यासाठी  प्रतिनियुक्ती करण्यात आलेल्या एकनू ५२ कर्मचाऱ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील २ अभियंते व २३ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे,तर यवतमाळ जिल्ह्यातील ४ अभियंते व २३ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.या व्यतीरिक्त लॉकडाऊनच्या काळात आपली उल्लेखनिय कामगीरीमुळे सन्मानित झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये विद्युत भवन कार्यालयातील ३ अभियंते व एक निन्मस्तर लिपीकाचा समावेश आहे.याचबरोबर अमरावती शहर विभागातील तांत्रिक अतांत्रिक वर्गवारितील १२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.अमरावती ग्रामीण विभागातील २०,मोर्शी विभागातील १९ तर अचलपूर विभागातील २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील मंडळ कार्यालयातील २,यवतमाळ विभागातील २०,पुसद विभागातील १८ आणि पांढरकवढा विभागातील १६ असे एकून ५६ कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दे म्हणून गौरविण्यात आले.

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *