Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम / बोन्साय निर्मिती” तंत्रज्ञानाचा ऑनलाईन माध्यमातून शेकडो बागकार्मिनी घेतला लाभ

बोन्साय निर्मिती” तंत्रज्ञानाचा ऑनलाईन माध्यमातून शेकडो बागकार्मिनी घेतला लाभ

अमरावती : वृक्षलागवडीची आवड आणि  छंद जोपासणाऱ्या बाग प्रेमीसाठी अमरावती गार्डन क्लब नेहमीच सज्ज असते व त्या अनुषंगाने विविध नियोजनबद्ध कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करीत असते. आज जगभरात करोनाचे सावट पसरले आहे सर्वजण या आपत्कालीन संकटाचा सामना  करीत असताना  क्लबद्वारा  प्रत्यक्षरीत्या राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाला जिवंत ठेवण्यात आले आहे. याला मुख्य कारण म्हणजे निसर्गप्रेमी बाग प्रेमी नागरिकांची मागणी आणि आपल्या सुसंबद्ध आयोजनासाठी क्लबची ख्याती होय.

सद्यपरिस्थितीत फक्त अमरावतीच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून आणि ईतर राज्यातून देखिल अनेक बागप्रेमी मंडळी ऑनलाईन माध्यमातून जुळले आहेत आणि आपला बागकामाचा छंद जोपासत आहेत. या अनुशंगाने  ज्यांना फुलझाडांची आवड आहे परंतु जागेअभावी ते आपला छंद पूर्ण करू शकत नाही  अशा सर्व  नागरिकांसाठी गार्डन क्लब द्वारा बोन्साय निर्मिती कार्यशाळा नुकतीच  आयोजित करण्यात आली होती.

बोन्साय ही कला छोटय़ाशा माध्यमातून निसर्ग, हिरवळ आणि छोटय़ात छोटय़ा गोष्टींकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टिकोन निर्माण करते. छोटय़ा कंटेनर्समध्ये तुम्ही शतकानुशतकं झाडं जिवंत ठेवू शकता. योग्य काळजी, चांगली माती, सूर्यप्रकाश, पाणी यामुळे आपण जुनी झाडं अनेक वर्ष  सांभाळून ठेवू शकता. नेहमी आपण बागकामासाठी ज्या तंत्रांचा वापर करतो त्याच प्रकारे पेरणी किंवा लागवड, आकार देणे, कुंडीत वाढवणे यासारख्या तंत्रांचाच वापर करून  ही झाडे त्रिमीतीय आकारात आणून नैसर्गिक झाडांची सुंदर वाढ करता येते आणि  या झाडांची मिळून छोटेखानी बाग घरातच तयार होवू शकते.

बोन्साय एक जापानी कला असून त्याचे वास्तुशास्त्रात सुद्धा तेवढेच महत्त्व आहे सिमेंट काँक्रिटच्या जंगलात वृक्ष लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही तसेच शहरी भागात असल्यामुळे मोठ्या वृक्षांची लागवड करणे जवळजवळ अशक्य झाले आहे तेव्हा बोन्साय अर्थात वामन वृक्ष या पद्धतीमुळे आज ही बाब शक्य आहे. खरतर पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अतिशय चांगला पर्याय आहे. बोन्साय या अंतर्गत हार्टीकल्चर विज्ञान आणि सौंदर्य शास्त्र या विषयांचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त होऊन आपली बाल्कनी, खिडक्या, गच्ची किंवा कमी जागे मध्ये  फुलझाडे यांचे सौंदर्य सहज साकारता येवू शकते. ही कला जगभरात अतिशय प्रसिद्ध आहे या कलेचा वापर अंतर्गत सौंदर्यीकारणासाठी सुद्धा होतो.

यामुळे ही पारंपारिक झाडे आपण वर्षानुवर्ष सांभाळून ठेवू शकतो अगदी पिंपळ गुलमोहर आंबा संत्री-मोसंबी यासारखी झाडे सुद्धा बोन्साय तयार करण्यासाठी उपयोगात आणता येऊ शकतात. बोन्साय तयार करण्यासाठी फक्त पाहिजे चिकाटी बोन्साय कसे करावे? त्यासाठी झाड कुठून मिळवावे? सुरुवात कधी करायची? झाडाची छाटणी इत्यादि सर्व शास्त्रीय माहिती अनेक  वर्षापासून नावलौकिक प्राप्त केलेले डॉ. किशोर बोबडे यांच्या तज्ञ मार्गदर्शनातून प्राप्त झाली. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉ. किशोर बोबडे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारा प्रत्यक्ष शास्त्रीय माहिती दिली आणि दुसर्‍या सत्रामध्ये कृतीद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविले. या प्रात्यक्षिकासाठी योग्य माती मिश्रण,  बोन्साय बनवण्यासाठी लागणारे रोपटे याचा उपयोग करण्यात आला. 

या कार्यशाळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो बागप्रेमी नागरिकांनी सहभाग घेऊन हे तंत्रज्ञान आत्मसात केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिनल केचे आयोजन सचिव यांनी केले तर प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉ.सुचिता खोडके पूर्व अध्यक्ष यांनी करून दिला. सहभागींच्या शंकांचे निरसन करण्याच्या दृष्टीने  विशेषत्वाने आयोजिलेले चर्चासत्र आणि तांत्रिक बाजू प्राध्यापक डॉ.दिनेश खेडकर,अध्यक्ष यांनी सुसूत्रतेने सांभाळली. प्रात्यक्षिकाचे थेट प्रक्षेपण डॉ. उमेश कनेरकर यांनी केले सरतेशेवटी डॉ मयूर गावंडे कार्यशाळा समन्वयक यांनी आभार व्यक्त केले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री.सुभाष भावे, उपाध्यक्ष, डॉ. शशांक देशमुख, कोषाध्यक्ष, डॉ. रेखा मग्गीरवार, सचिव, डॉ. गणेश हेडावू, सह सचिव त्याच प्रमाणे सन्माननीय कार्यकारिणी सदस्य डॉ. गजेंद्र पचलोरे आणि विशेष आमंत्रित सदस्य डॉ. मोनाली घुरडे, डॉ.युगंधरा राजगुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. अनेक बागप्रेमी नागरिकांच्या खास आग्रहास्तव पुन्हा एका नविन विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येईल तसेच येत्या काळात हँगिंग आणि सिझनल्स प्लांट्स वर कार्यशाळा नियोजित असल्याचे क्लबच्या सचिव डॉ रेखा मग्गीरवार यांनी सांगितले.

About Editor Desk

Check Also

कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे आणि पर्यटकांसाठी आदर्श कार्यप्रणाली जारी

मुंबई : कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सोमवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *