Breaking News
Home / ॲग्रो संवाद / औरंगाबाद येथील कर्तव्यनिष्ठ महिलांचा सत्कार

औरंगाबाद येथील कर्तव्यनिष्ठ महिलांचा सत्कार

औरंगाबाद: येथील मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला, याप्रसंगी महामाया सेवाभावी संस्था, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था, सम्यक विपश्यना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लोकराज्य व समाज संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “कर्तव्यनिष्ठ महिलांना सन्मान चिन्ह ” देण्यात आले,

यामध्ये भाग्यश्री गोपणारायन ह्या रमाई बहुउद्देशीय प्रतिष्ठान भीमनगर, भावसिंगपूरा च्या सचिव आहेत, तसेच साधना गोपणारायन सामाजिक कार्यकर्त्या अकोला , सौ. संगीता देंडवे , आगर माजी पंचायत समिती सदस्या, अकोला,यांना त्यांच्या सामाजिक व कौटुंबिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले, संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कांबळे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते, शिलवंत गोपणारायन व अमर हिवराळे यांनी प्रयत्न केले.

About Editor Desk

Check Also

प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रभात’ तर्फे काव्यांजली कार्यक्रम संपन्न.

अमरावती : विदर्भात आपल्या विपुल साहित्यसेवेने प्रसिद्ध असलेले प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *