Breaking News
Home / ॲग्रो संवाद / प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रभात’ तर्फे काव्यांजली कार्यक्रम संपन्न.

प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रभात’ तर्फे काव्यांजली कार्यक्रम संपन्न.

अमरावती : विदर्भात आपल्या विपुल साहित्यसेवेने प्रसिद्ध असलेले प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्थानिक खोलापुरी गेट येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र प्रभात एज्युकेशन सोसायटी तर्फे काव्यांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लिबरल फ्रेंड्स असोसिएशन हॉल बडनेरा रोड  येथील काव्यांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक गझलकार विष्णू सोळंके तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभात एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  उपस्थित होते. कार्याक्रमची सुरुवात दिपप्रज्वलन करून व स्व. प्रा. डॉ. गिरीष खारकर यांच्या प्रतिमेस हारार्पण करून करण्यात आली. प्रभात एज्युकेशन सोसायटी अम.  ह्या अभ्यासकेंद्राचे माजी केंद्रप्रमुख प्रा. डॉ. गिरीष खारकर यांच्या साहित्य सेवेचा व कार्याचा आलेख प्रमुख अतिथी वि.दा.पवार यांनी आपल्या प्रास्ताविकातुन उपस्थितांसमोर मांडला. त्यानंतर स्व. गिरीष खारकर यांना सौ.कल्पना विघे(वानखडे) यांनी  आपली गझल समर्पित केली.

       “ मोकळ्या  केसात गजरा, तू सखे माळू  नकोस,

       सांजवेळी भावनांना, तू पुन्हा जाळू नकोस. ”

 राजेश महल्ले यांनी विरह  गीत सादर केले, त्यावेळी त्यांचा कंठ दाटुनी आला होता.

       “  रातभर जागली चांदणी एकली,

             कुठीसा दिसेना  चकोर चांदवा…

       याद येते तुही, याद येते तुही येवढा सांगवा,

             सांगजो गे हवा, सांगजो गे हवा… ”

डॉ.निवाने यांनी 

 “ वाजवा कि  नाचवा तुम्ही ,

              माणसाची खेळणी झाली…

             जिंदगी बेनुर होती,

             अंतयात्रा  देखणी  झाली… ”

ही कविता सादर केली

वसंत पाटील यांनी पर्यावरणातील बदला बद्दल कविता सदर केली.

       “  चेतवारे  ज्योत  विचाराची, ती  वसुंधरा आपली धरा,

       धडपडते भविष्य स्वास घ्याया, विचार कर तू रे जरा… ”

हनुमान गुजर यांनी त्यांची ‘ माणूस हा माणूस असतो ’ हि कविता  सादर केली.

       “ कधी व्यासा सारखा, मस्य गंधे च्या पोटी, इतिहासा सारखा

कोळीनी ची कूस असतो, शेवटी मानुस हा मानुस, असतो ”

काव्यांजलीचा शेवट हा विष्णू सोळंके याच्या ‘ माझीच अंत्ययात्रे ’च्या सादरीकरणाने झाली.

 “ माझीच अंत्ययात्रा मी पहातोच आहे,

मेल्यावारही फुलांना मी  न्याहाळतो आहे.

सरणास आज माझ्या जाळून घ्या सुखाने,

हा देह पेटतांना मी हासतोच आहे… ”

यावेळी अंकुर साहित्य संघाचे बुलढाणा येथील कवि, साहित्यिक सैय्यद अहमद यांना श्रद्धांजली  देण्यात आली. कोरोना काळात आपली सेवा निस्वार्थ भावनेने देणारे माजी सुभेदार वसंत पाटील यांचा संस्थेद्वारे सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमाचे संचालन सौ कल्पना विघे(वानखडे) यांनी तर आभारप्रदर्शन श्री प्रदीप चौधरी यांनी केले.

About Editor Desk

Check Also

जागतिक शांततेसाठी महत्मा गांधींचे विचार सदैव अनुकरणीय: फ्रँक इस्लाम ‘जयहिंद’च्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये 150 देशातील नागरिकांचा सहभाग.

संगमनेर : जगामध्ये वाढत चाललेली अशांतता व वर्चस्ववाद हे मानवतेला अत्यंत धोकादायक असून शांततेतूनच सर्वांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *