Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / अमरावती गार्डन क्लब वार्षिक पुष्पप्रदर्शन आणि स्पर्धा संपन्न ! श्रीमती निर्मलाताई देशमुख ठरल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियंस चषकाच्या मानकरी

अमरावती गार्डन क्लब वार्षिक पुष्पप्रदर्शन आणि स्पर्धा संपन्न ! श्रीमती निर्मलाताई देशमुख ठरल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियंस चषकाच्या मानकरी

अमरावती : ग्रीष्म ऋतूची दाहकता सहन करण्यापूर्वी मनमोहक फूलझाडांचा निखळ आनंद अनेक अमरावतीकरांनी भरघोस लुटला, औचित्य होते अमरावती गार्डन क्लब, अमरावती आणि विश्वभारती पब्लिक स्कूल, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या वार्षिक पुष्पप्रदर्शन आणि स्पर्धेचे. शहराच्या हृदयस्थानी वसलेल्या विश्वभारती पब्लिक स्कूलचे प्रांगण विविधरंगी फुलझाडांनी नटले होते. स्पर्धेच्या  केंद्रस्थानी होते अडेनियम. या प्रदर्शनाचा आनंद घेता यावा करीता नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. होलिकोत्स्वाच्या पर्वावर विविध रंगांची उधळण करून आनंद घेण्यासाठी सज्ज असलेल्या अंबावासियांना सृष्टिने देखिल अनमोल खजिना या प्रदर्शनाच्या रुपाने गार्डन क्लबच्या माध्यमातून बहाल केला.

एकंदर ४५ स्पर्धकानी ९ गटात सहभाग नोंदविला आणि अत्यंत चुरशिची स्पर्धा झाली. प्रा. चंद्र्शेखर देशमुख, प्रा. मानवेन्द्र देशमुख, डॉ.शशांक देशमुख,डॉ. सतीश मालोदे, श्री.गावंडे,डॉ. सुचिता खोडके, श्रीमती अल्काताई गभने, श्रीमती छायाताई बोबडे, डॉ. किशोर बोबडे, श्री. आशिष क्षिरसागर या सर्व तज्ञ परिक्षकानी परिक्षण केले. सदर पुष्प प्रदर्शनात ऍडेनियम, सीझनल फ्लॉवर्स, कॅक्टस, सक्यूलँट, बोन्साय, प्लांटस ऑन मॉस स्टिक, फोलिएज, हँगिंग बास्केट आणि इतर विविध गटाकरिता अनेक मान्यवर दानदात्यानी पुरस्कृत केलेले एकूण १२ चषक प्रदान करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे अमरावती गार्डन क्लब आणि विश्वभारती पब्लिक स्कूल यांच्या मध्ये फुललेल्या नात्याला स्मरणीय करण्याच्या दृष्टीने आणि तेथिल विद्यार्थी, पालक शिक्षक वृंद  यांनी विशेष सहभाग घ्यावा या उद्देशाने पुष्प रचना हा गट आयोजित केला होता. त्यामध्ये उज्ज्वल मिटकरी, गौरी देशमुख आणि पल्लवी शिरपूरकर यांना विजेते घोषित करून चषक प्रदान केले.

आज या बक्षिस वितरण समारंभ पार पडला. मा. दिनेशजी बूब, नगरसेवक, अमरावती, मा. नरेंद्र वानखडे, महिला व बालविकास अधिकारी, मा. सुरेश पाटिल उपायुक्त अमरावती महानगरपालिका अमरावती यांच्या हस्ते विजेत्यांना विविध गटाकरिता चषक प्रदान करण्यात आले. श्रीमती निर्मलाताई देशमुख यांनी विविध गटात सहभाग नोंदवून जास्तीत जास्त प्रथम आणि द्वितीय पारितोषिके पटकाविली त्या मध्ये स्व. प्रवीण खोडके मेमोरियल गुलाब चषक, स्व. श्रीकांत इंगोले सीझनल फ्लावर्स चषक आणि सर्वोत्कृष्ट विजेता स्पर्धक म्हणून अमरावती गार्डन क्लबची मानाची चॅम्पियन ऑफ चॅम्पियंस ही ट्रॉफी त्यांना मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आली. श्रीमती अलकाताई गभणे यांना चॅम्पियन, बोन्साय आणि कैक्टस व् सक्युलंट, प्लांट्स ऑन मॉसस्टिक अशा विविध गटात चार चषक प्रदान करण्यात आले, गतविजेते श्री. मुकुंद सिकदर यावेळी प्रथम उपविजेते ठरले तर श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय द्वितीय उपविजेते आणि श्री. प्रथमेश भावे तृतीय उपविजेते ठरले. या प्रदर्शनातील मुख्य आकर्षण अडेनियम अर्थात डेसर्ट रोज चे मानकरी ठरल्यामुळे श्री. अनिल भोंडे यांना स्व. प्रा. पद्माकर चौहान स्मृती अडेनियम चषक प्रदान करण्यात आला. श्री शिवाजी कृषि महाविद्यालय याना श्रीमती इंदुताई गभणे स्मृति गुलाब चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

या पुष्पप्रदर्शन व स्पर्धेच्या निमित्ताने विश्वभारती पब्लिक स्कूल तर्फे मॉटेसरी मटेरियल डेमॉटस्ट्रेशन आणि प्रदर्शनसुद्धा ठेवण्यात आले. पुष्पप्रदर्शनाने पर्यावरण पूरक बाबीवर लक्ष वेधले गेले तसेच विश्वभारती शाळेने मॉटेसरी मटेरियलस् सुद्धा कौतुकाचा विषय ठरले होते. फुलासारख्याच चिमुकल्या मुलांना शाळेकडून अश्याप्रकरच्या मटेरियलच्या माध्यमातून शिक्षण दिल्या जाते या बाबीची प्रशंसा उदघाटक मा. सुलभा खोडके आणि समारोप कार्यक्रमात मा. दिनेश बुब आणि नगरसेवक आणि मा. श्री नरेंद्र वानखडे यांनी केली. अश्या प्रकारचे शिक्षण सर्वच मुलांना मिळावे असा विचार सुद्धा मांडला. गार्डन क्लबचे अध्यक्ष डॉ दिनेश खेडकर यांच्या अध्यक्षतेत हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर विश्वभारती शिक्षण संस्थेचे आणि गार्डन क्लबचे कार्यकारी परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ रेखा मग्गीरवार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ अश्विनीकुमार वाजपेयी यांनी केले.

विश्वभारती शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष डॉ. प्रशांत पावडे, उपाध्यक्ष पंकज देशमुख, सचिव डॉ. बाजपेयी आणि कोषाध्यक्ष प्रा. सावरकर यांनी संस्थेतर्फे शाळेच्या प्रांगणात भेट देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले व गार्डन क्लबच्या या आयोजनाची विश्वभारती पब्लिक स्कूल ला संधी दिली या साठी आभार व्यक्त करण्यात आले.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *