Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / शिक्षकांना जुनी योजना देण्यास सरकारला भाग पाडू-आझाद मैदानावरील धरणे आंदोलनात संगीता शिंदे यांचा एल्गार

शिक्षकांना जुनी योजना देण्यास सरकारला भाग पाडू-आझाद मैदानावरील धरणे आंदोलनात संगीता शिंदे यांचा एल्गार

मुंबई : आझाद मैदान शिक्षकांसाठी ऐतिहासीक मैदान ठरणार असून याच मैदानावरून मी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेंशन योजना मिळवून दिल्याशिवाय स्वस्था बसणार नाही असा निर्धार करत शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी आज राज्यसरकारविरोधात एल्गार पुकारला. सरकार जुन्या पेंशनवरून सातत्याने घुमजाव करत असून शिक्षकांचे प्रतिनिधी त्याची सरमिसळ करून सरकारला मदत करत आहेत. त्यामुळे आता जुनी पेंशन लागू करण्यासाठी आंदेालन हाच पर्याय असून आपण कुठल्याही परिस्थितीत मागे न हटता सरकारला जुनी पेंशन योजना लागू करण्यास भाग पाडू असे अभिवचन संगीता शिंदे यांनी हजारोंच्या संख्येने जमलेल्या शिक्षकांना संबोधित करताना दिले.


मुंबई येथील आझाद मैदानावर शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यभरातील हजारो शिक्षक जुन्या पेंशनच्या मागणीसाठी एकत्रित आले आहे. यावेळी बोलताना संगीता शिंदे यांनी सर्वच सरकारांनी जुन्या पेंशनच्या बाबतीत शिक्षकांवर अन्याय केला असून आताही केवळ टोलवाटोलवीची कामे प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री करत आहेत. शिक्षकांचे प्रतिनिधी देखील केवळ आपली पोळी शेकण्यासाठी जुन्या पेंशनची सरमिसळ करण्यात मग्न आहेत. त्यामुळे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक जुन्या पेंशनपासून अद्यापही वंचितच आहेत. हा प्रकार आता सहन केला जाणार नसून सरकारने जुन्या पेंशनसाठी नियुक्त केलेल्या समितीचे कार्य तातडीने पूर्ण करून शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी अन्यथा शिक्षकांना पुन्हा एकदा विद्रोह करावा लागेल असा ठणठणीत इशारा संगीता शिंदे यांनी सरकारला दिला. यावेळी शिक्षकांनी देखील मोठ्या आवाजात संगीता शिंदे यांच्या आवाहनावरून त्यांच्या पाठिशी पूर्णपणे राहण्याचा सल्ला दिला आहे.

संगीता शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकारकडून घेण्यात येत असून लवकरच मंत्र्यांशी चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जुनी पेंशन योजना लागू होण्याच्या कार्यवाहीस आता गती मिळण्याची शक्यता आहे. या आंदेालनात अमरावती विभाग तसेच राज्यातील अन्य सर्वच विभागातून जवळपास ४ ते ५ हजार शिक्षक सहभागी झाले आहेत.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *