Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / राष्ट्रीय आंतरविद्यापीठ मूट कोर्ट स्पर्धेत डाॕ. पं.दे. लॉ कॉलेज उपविजेता

राष्ट्रीय आंतरविद्यापीठ मूट कोर्ट स्पर्धेत डाॕ. पं.दे. लॉ कॉलेज उपविजेता

अमरावती : नुकत्याच राजीव गांधी नॕशनल काॕलेज आॕफ लाॕ, पटियाला संस्थेने प्रथम राष्ट्रीय आंतरविद्यापीठ मूट कोर्ट स्पर्धा घेतली. यात डाॕ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या संघाने सांघिक उपविजेतेपद पटकाविले.

या संघात कु. आकांक्षा असनारे, वैभव इंगळे व कु. निकीता पाटील ह्यांचा समावेश होता. तसेच संपूर्ण स्पर्धेत एकमेव बेस्ट स्पिकर अवार्ड हा कु.आकांक्षा असनारेला प्राप्त झाला. उपविजेतेपद, चषक व २०,०००/- रू रोख असे चमूच्या बक्षिसाचे स्वरूप होते. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ५०००/- रू. रोख असे उत्कृष्ट वक्त्याच्या पुरस्काराचे स्वरूप होते. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ (AIU) या शिखर संस्थेने प्रथमतः आयोजित केलेल्या या स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न स्थानिक डाॕ. पंजाबराव देशमुख काॕलेज आॕफ लाॕ, अमरावती च्या संघाने उपविजेतेपदावर शिक्कामोर्तब करणे ही बाब स्तुत्य व गौरवास्पद आहे.

प्रथमतः आयोजित स्पर्धेत उत्कृष्ट वक्त्याचा पुरस्कार प्राप्त करणे ही बाब ऐतिहासिक नोंद ठरेल. देशातील अनेक नामवंत राष्ट्रीय विधी महाविद्यालयांच्या चमू या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यांना नमवून हा पुरस्कार प्राप्त करणे ही बाब लक्षणीय आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य डाॕ. प्रणव मालविय, डाॕ. राजेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिले.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *