Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / संशोधक विद्यार्थ्यांच्या समस्येचे समाधान केल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन – प्रा प्रदीप खेडकर, अध्यक्ष, शिक्षण मंच

संशोधक विद्यार्थ्यांच्या समस्येचे समाधान केल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन – प्रा प्रदीप खेडकर, अध्यक्ष, शिक्षण मंच

अमरावती :संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ क्षेत्रात आचार्य पदवीसाठी संशोधन करून मुल्यांकन प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजे व्हायवा आणि ओपन डिफेन्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष पदवी प्राप्तीसाठी ग्राह्य असलेली अधिसूचना जाहीर व्हायला बराच कालावधी लागत होता. या वेळ जाऊं नये म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचने विद्यापीठाकडे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी निवेदन सादर केले होते. त्या निवेदनाचा वर्षभर सातत्यपूर्ण पाठपुरावा संघटनेद्वारा केला गेला. या प्रयत्नाच्या फलश्रुतीस्वरूप आता विद्यापीठाच्या अलीकडेच घेण्यात आलेल्या निर्णयानुसार संशोधक विद्यार्थ्याने व्हायवा आणि ओपन डिफेन्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर परीक्षकांच्या अहवालाला अनुसरून त्याच दिवशी विद्यापीठ संबंधित विद्यार्थ्याला अधिसूचना दिल्या जाईल अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

विद्यार्थी केंद्रित कार्यासाठी केलेल्या शिक्षण मंचच्या मागणीचा सकारात्मक विचार करून तशी कार्यवाही करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाचे स्वागत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचचे अध्यक्ष मा. प्रा. प्रदीप खेडकर यांनी केले.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *