Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / अमरावती विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार श्री गाडगे महाराज महाविद्यालय,मुर्तिजापूरला जाहीर

अमरावती विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार श्री गाडगे महाराज महाविद्यालय,मुर्तिजापूरला जाहीर

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालये, शाळा व सामाजिक भावनेतून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे सक्षम प्राधिकारणांकडे नोंदणीकृत विविध प्रतिष्ठान-स्वयंसेवी संस्था व व्यक्ती वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,जलव्यवस्थापन,जलसंवर्धन, जैवविविधता संवर्धन, अपारंपारिक उर्जा स्त्रोताचा वापर व जनजागृती करणा­या संस्थेला विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात येते. 2019 वर्षाकरीता विद्यापीठ पर्यावरण पुरस्कारासाठी विद्यापीठाशी संलग्नित श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मुर्तिजापूर, जि. अकोलाची निवड करण्यात आली आहे.  दि. 24 फेब्राुवारी, 2020 रोजी विद्यापीठात संपन्न होणा­या पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

गट ‘अ’ मध्ये श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मुर्तिजापूरची निवड झाली असून महाविद्यालयाचा परिसर वृक्षवल्लींनी बहरला आहे.  पर्यावरणासाठी व निसर्ग संरक्षणासाठी महाविद्यालयाने उत्कृष्ट कार्य केले आहे.  महाविद्यालयाने ठिबक सिंचन तंत्राचा वापर करुन पाण्याची बचत केली असून शेततळे, बांध, विहिर, बोअरवेल पुनर्भरण, जलपुनर्भरण आदी पर्यावरण व निसर्ग संरक्षणपुरक कार्य महाविद्यालय परिसरात केल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मोलाची मदत झाली आहे.पर्यावरणाचे रक्षण म्हणून 5 किलोव्हॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प महाविद्यालयात कार्यान्वित करण्यात आला असून जलसंवर्धन, पर्यावरण, जलव्यवस्थापन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आदी संदर्भात विविध उपक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालयाने लोकजागृती केली आहे.  निसर्ग रक्षणासाठी महाविद्यालयाने उचललेली पावले स्वागतार्ह आहे. याशिवाय इतरही उपक्रम महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात आलेले आहेत. या सर्व उपक्रमांसाठी महाविद्यालय व्यवस्थापनाचे पदाधिकारी व प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली प्राध्यापक, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी भरीव योगदान दिले आहे. 

 गट ‘ब’ व्यक्ती गटात प्राप्त झालेल्या प्रस्तावापैकी कोणीही पात्र ठरलेले नाही, त्यामुळे या वर्षीचा हा पुरस्कार गट ‘अ’ मध्ये श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मुर्तिजापूर या महाविद्यालयाला प्रदान होणार असून शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, पंधरा हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.  सत्कार कार्यक्रमाप्रसंगी हा पुरस्कार महाविद्यालयाच्या प्राचार्यांना प्रदान केल्या जाणार आहे. कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले आहे.

पर्यावरण पुरस्कार 2019 साठी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रफुल्ल गवई यांचे अध्यक्षतेखाली श्री उत्पल्ल टोंगो सदस्य, विषयतज्ज्ञ म्हणून प्राचार्य डॉ. निलेश गावंडे व डॉ. सुचिता खोडके आणि सदस्य सचिव उद्यान अधीक्षक श्री अनिल घोम यांची निवड समिती गठीत केली होती.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *