Breaking News
Home / ॲग्रो संवाद / ‘ शेतकऱ्यांनो ‘ कीटकनाशक ठरतेय जीवघेणे

‘ शेतकऱ्यांनो ‘ कीटकनाशक ठरतेय जीवघेणे

पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन – कीटकनाशक फवारणी करणारा शेतकरी वर्गाकरिता जीवघेणे ठरत असल्याचे अनेक उदाहरण अलीकडील काळात आढळून आलेले आहे. अलीकडील काळात शेतकरी सुद्धा जहाल कीडनाशके वापरण्यात भर देत आहे ज्यातून विषबाधेसारख्या घटना उदभवतात,तेव्हा शेतकऱ्यांनी जहाल कीटकनाशक आपल्या शेतात फवारणी करून आपला जीव धोक्यात घालू नये ह्या करिता कृषी विभागाकडून वारंवार आवाहन करण्यात येत असते.

शेतकरी – शेतमजूर इत्यादीना फवारणी करीत असतांना विषबाधा होण्याचा घटनांमध्ये वाढ झालेली आहे विशेषतः अमरावती ,यवतमाळ, वाशीम तसेच बुलडाणा अकोला जिल्ह्यांमध्ये सुद्धा सदर फवारणीतून विषबाधेचे प्रकार वारंवार घडत आहेत हे चिंताजनक आहे,चुकीच्या कीटकनाशक मिश्रणातून तसेच चुकीच्या हाताळणीतून- निष्काळजीपणे वापर केल्याने विषबाधा होऊन दवाखान्यात दाखल करण्याचे तसेच प्रसंगी मृत्यू सुद्धा ओढावल्याचे प्रमाण चिंताजनक आहे,लाल त्रिकोण खूण केलेली कीटकनाशके मानवी आरोग्यास हानिकारक असून अश्या कीटकनाशकांचा वापर कृषी सेवा केंद्र तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा करू नये ह्या करिता कृषी विभागातर्फे विशेष आवाहन वारंवार करण्यात येत असते,तसेच संबंधितांवर कीटकनाशके कायद्यानुसार कार्यवाही सुद्धा करण्यात येत असते. जेणे करून मानवी आरोग्याला हानी-कारक कीडनाशकांची विक्री आणि वापर होणार नाही.

तेव्हा शेतकरी बांधवानो विषारी कीटकनाशके वापरून स्वतःचा आणि प्रसंगी ग्राहकांचा जीव धोक्यात घालू नये हि काळजी आपण सगळे घेऊ या !

About Editor Desk

Check Also

प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रभात’ तर्फे काव्यांजली कार्यक्रम संपन्न.

अमरावती : विदर्भात आपल्या विपुल साहित्यसेवेने प्रसिद्ध असलेले प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *