Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / इंडिया बुक रेकॉर्ड्समध्ये `थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ` मोहीम

इंडिया बुक रेकॉर्ड्समध्ये `थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ` मोहीम

नागपूर : शिक्षक एकनाथ पवार हे शेतकरी सक्षमीकरणाकरिता अनेक वर्ष काम करीत आहेत .

शेतकरी सक्षमीकरणा करिता पवार ह्यांनी राबविलेल्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहिमेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् कडून घेण्यात आलेली आहे. कर्जबाजारीपणा ,सततची नापिकी,अस्मानी संकट,पावसाचा – हवामानाचा लहरीपणा या सर्वांमधून सुटका करून घेण्यासाठी बळीराजाने केलेल्या आत्महत्या इत्यादींचे सत्र थांबावे,ह्या क्षेत्रातली नकारात्मकता थांबून सकारात्मक वातावरण निर्मिती व्हावी ह्या सामाजिक बांधिलकी मधून शेतकऱ्यांना आत्मसन्मानाने जगता यावे , म्हणून थेट शेतकऱ्यांच्या बांधावरजाऊन फळझाड देऊन,प्रसंगी गुलाब फुल देऊन शेतकरी करीत असलेले काम-कष्ट कसे आणि किती महत्वाचे आहे आत्महत्या करू नका जीवन अनमोल आहे ,आपण जगलात तर आम्ही जगू अश्या प्रकारचा भावनिक संदेश गावा -गावात फिरून शेतकऱ्यांच्या बांधावर या मोहिमेद्वारे पेरण्यात आला.
या उपक्रमातून विदर्भामध्ये दहा हजार फळझाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट्य होते. वसंतराव नाईक विकास संशोधन व प्रशिक्षण (वऱ्हाटी ) संस्थेने सदर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम राबविण्यासाठी पाठबळ उभे केले होते,सोबतच शीतलवाडी (रामटेक ) तास (भिवापूर ) इत्यादींसह इतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी ग्रामसभेचा ठराव या मोहिमेकरिता मंजूर करून बळीराजाला पाठिंबा दिला होता. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहिमेचे इंडिया बुक रेकॉर्डस् ने नोंद घेतल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे .

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *