Breaking News
Home / बातम्या / सिंदेवाहीत वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

सिंदेवाहीत वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

सिंदेवाही – शिवणी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या शिवणी गावाजवळील शिवणी – पांढरवाणी रोडवरील जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने अचानकपणे हल्ला केल्याने गुराखी जागीच ठार झाल्याची घटना आज (ता.२८)  दुपारला साडेतीन वाजता घडली.


  शिवणी येथील रहिवासी असलेल्या गुराख्याचे नाव तुलसीदास पाकेवार (वय ५५) असे आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे.  गाव परिसरात अचानक झालेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केल्या जात आहे. सिंदेवाही तालुक्यात होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करून मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. शिवणी वनपरिक्षेत्रांचे अधिकारी घटनेचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करीत आहेत.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *