Breaking News
Home / ॲग्रो संवाद / शेतकऱ्यांनो हळद या नगदी पिकाकडे वळा ! डॉ.प्रकाश वानखेडे

शेतकऱ्यांनो हळद या नगदी पिकाकडे वळा ! डॉ.प्रकाश वानखेडे

उत्पादन -मागणी आणि भाव अधिक असल्याने हळद खात्रीचे पीक होय

नागपूर : हळदीच्या पिकापासून भरपूर उत्पादन मिळत असल्याने मग ती हळद बेणं म्हणून विकावं नाहीतर स्वतःचा ब्रँड बनवून पावडर म्हणून विकल्यास भरपूर नफ्यासोबत लोकांना चांगल्या प्रतीची हळद उपलब्ध करून दिल्याचे समाधान सुद्धा मिळत असल्याचे सह्याद्रि फार्म अँड हेल्थकेअर प्रा.लि. चे समूह संचालक डॉ. प्रकाश वानखेडे ह्यांनी ॲग्रो टाइम्स सोबत ॲग्रो संवाद या कार्यक्रमात सांगितले .

डॉ. प्रकाश वानखेडे ॲग्रो संवादकार्यक्रमामध्ये बोलतांना म्हणाले एकरी उत्पादन तसेच वाढलेली मागणी आणि चढा भाव मिळत असल्याने पारंपारिक पीक उत्पादनापासून उबलेल्या शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा गेल्या काही वर्ष्यांपासून हळद लागवडीकडे वळविलेला दिसून येत आहे,तसेच गत वर्ष्यांपासून हळद पेरणी पासून तर काढणी पर्यंत अनेक नवं -नवीन तंत्र या क्षेत्रात आल्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा हळद पिकाकडे वाढलेले आहे त्यामुळेच महाराष्ट्रातील जिल्ह्यात दरवर्षी हळद लागवडीचे क्षेत्र १५ टक्क्यां पर्यंत वाढलेले आहे.

पारंपारिक पीक उत्पादन जरी अधिक मिळवून देत असेल पण बाजारपेठ रास्त भाव देत नसल्याने पारंपारिक शेती नुकसानीत जात आहे परंतु महाराष्ट्रातील हवामान आणि जमिनी मध्ये अधिक उत्पादन – तसेच बाजारपेठेत मागणी आणि भाव अधिक असल्याने हळद खात्रीचे पीक होय असे प्रतिपादन डॉ. प्रकाश वानखेडे ह्यांनी केले.

डॉ. प्रकाश वानखेडे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले कि हळद पीक पेरण्याचे अनेक फायदे शेतकऱ्यांना आहे जसे – वन्य प्राण्यांचा त्रास नाहीच ,कीड-रोग येण्याचे प्रादुर्भाव होण्याचे अन्य पिकांच्या तुलनेत प्रमाण नगण्य आहे तसेच कमी दिवसात कमी जागेत जास्त उत्पादन देणारे हळद हे हक्काचे पीक होय.

हळदीच्या सुधारित जाती शोधण्याच्या आणि ग्राहकांना चांगल्या प्रतीची हळद उपलब्ध करून देण्याच्या वेडापायी भारतात प्रसिद्ध असे हळदीचे सेलम वाण जिथे पीक घेतल्या जाते अश्या तामिळ्नाडू मधील सेलम या गावी भेट देऊन तिथले प्रसिद्ध आणि ओरिजनल असे सेलम सुपर हि व्हरायटी खरेदी करून आणल्याचे डॉ. प्रकाश वानखेडे ह्यांनी सांगितले. हळदीच्या सुधारित जातीं बद्दल बोलताना डॉ. वानखेडे म्हणाले – अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी फुले स्वरूपा, कृष्णा,राजापुरी,कडप्पा, पिडिकेवि वायगाव ह्या पण जाती प्रसिद्ध आहे. केरळ मधील कालिकत येथे स्थित भारतीय मसाले संशोधन केंद्राने संशोधीत केलेल्या प्रगती या हळदीच्या वाणाचे १८० दिवसात हळद येते तसेच औषधीजन्य असणाऱ्या कुरकोमीन चे प्रमाण ५.०७ इतके मिळत असल्याचे दिसून येत आहे .
अंतिम उपभोक्ता लक्ष्यात घेऊन तसेच पुढील पिढी सशक्त बनविण्यासाठी ग्राहकाला जे -जे सर्वोत्तम आणि ओरिजनल आहे असे देण्यासाठी सह्याद्रि फार्म अँड हेल्थकेअर प्रा.लि.समूहाची वाटचाल सुरु आहे शेवटी ग्राहकाच्या चेहऱ्यावरचे समाधान आम्हांला लाख -मोलाचे आहे ;तेव्हा शेतकऱ्यांच्या नवीन आणि विशेतः युवा पिढीने हळद या नगदी पिकाकडे वळावे असे आवाहन डॉ.प्रकाश वानखेडे ह्यांनी केलेले आहे.

About Editor Desk

Check Also

प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रभात’ तर्फे काव्यांजली कार्यक्रम संपन्न.

अमरावती : विदर्भात आपल्या विपुल साहित्यसेवेने प्रसिद्ध असलेले प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *