Breaking News
Home / बातम्या / कर्मयोगी फाऊंडेशनची दिवाळी गोरगरिबांच्या दारी

कर्मयोगी फाऊंडेशनची दिवाळी गोरगरिबांच्या दारी

बुटीबोरी : कार्मयोगी फाऊंडेशनने बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कर्मयोगी गाडगेबाबानी सांगितल्याप्रमाणे  गोरगरीबांना कपडे द्या, भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्याना पाणी द्या व अनाठायी पैसा खर्च न करीता गरीब  मुलांच्या शिक्षणाकरिता पैसा खर्च करा याच तत्वांवर कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी  ही दिवाळी बुटीबोरी येथे भटक्या समाजातील पालवाची घरे करून राहणाऱ्या जवळपास ५० लोकांना नवीन कपडे देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. तसेच सर्वाना फराळाचे देऊन व त्यांच्या सोबत फराळाच करून माणुसकीचे दर्शन घडविले.

खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण गाडगेबाबानी  सांगितल्याप्रमाणे साजरा करून एक आदर्श घडविला. यावेळी पंकज ठाकरे बोलताना म्हणाले की जे काम महात्मा फुले, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांनी केले तेच काम आम्हाला समाजातील वंचित, शोषित, गोरगरीब, व भटक्या  लोकांसाठी करायचे आहे. समाजातील दुर्बल घटकापर्यंत पोहोचून लोकांना त्यांचे हक्क मिळवून द्यायचे आहे. तसेच प्रामाणिक, निस्वार्थीपणे व निरंतरपणे कर्मयोगी फाऊंडेशनच्या प्रत्येक कार्यकर्त्याने योगी होण्यापेक्षा कर्मयोगी व्हावे असे ते म्हणाले. 

या कार्यक्रमाला आजीवन ग्रामगीता  प्रचारक रुपरावदादा वाघ, कर्मयोगी फाऊंडेशनचे मार्गदर्शक तुळशीदास भानारकर, सरचिटणीस शिवाजी बारेवार , वर्षा पारसे, शरद कबाडे, शेषराव पारसे, अशोक ठाकरे, देविदास ठाकरे, श्याम भोयर, राजू तायवाडे, रुख्मा ठाकरे, सोनू ठाकरे, दुर्गा सीडाम, टिकेश्वर पारधी, सुनील विश्वकर्मा, विजय डोंगे, प्रविणा ठाकरे, शीतल बारेवार, नंदू मानकर, वर्षा मानकर, रामदास राऊत, गौरवसिंग हजारी, संदीप बालविर, तुषार डेरकर, पानवलीया साहेब, प्रशांत झाडे, रिता कुटे, अंबुलेताई, मधुकरराव झाडे, झाडेकाकू, प्रकाश कुबडे, लीलाधर कनीरे, नितीन कुरई, चारुकेश कापसे, ही सर्व मंडळी व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मयोगी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रमयशस्वी होण्यासाठी मोलाचे श्रम घेतले.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *