Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / आलागोंदी व टेंभरी येथे मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

आलागोंदी व टेंभरी येथे मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

नागपूर : कर्मयोगी फाऊंडेशन व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणा सर्कल मध्ये मोतीबिंदूचे उच्चाटन करण्याचे लक्ष नियोजित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे  बुटीबोरी जवळील आलागोंदी व टेंभरी ग्राम येथे निशुल्क मोतीबिंदू तपासणी शिबिर राबविण्यात आले.

या शिबिरात ८० रुग्णांनी आपले डोळे तपासून घेतले. त्यात १४ रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे निदर्शनास आले, या सर्व रुग्णांना लता मंगेशकर रुग्णालय नागपूर येथे निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांचा येण्याजाण्याचा, राहण्याचा व जेवणाचा सर्व खर्चही निशुल्क करण्यात येणार आहे. डॉ.  कपिल चव्हाण  यांनी या कामी आपली सेवा दिली. या कार्यक्रमाचे नियोजन कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता फाऊंडेशनचे संदीप हेडाऊ स्वतः उपस्थित होते तसेच आलागोंदी ग्रामचे प्रतिष्ठित नागरिक सुधाकर ढोके, ब्राम्हणीचे माजी सरपंच वासुदेवराव घोडमारे  , कर्मयोगी फाऊंडेशनचे  मार्गदर्शनक  तुळशीदासजी भानारकर ,सरचिटणीस शिवाजीे बारेवार, संघटन प्रमुख शरद कबाडे, प्रसिद्धी प्रमुख सुनील विश्वकर्मा, अशोक ठाकरे व गावकऱ्यांनी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *