Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / निसर्गाशी सांगड साधत “ शाश्वत शेती विकास आणि पर्यावरण संतुलन ”

निसर्गाशी सांगड साधत “ शाश्वत शेती विकास आणि पर्यावरण संतुलन ”

विजय औताडे – सातारा – ज्येष्ठ पर्यावरण  तज्ञ

शाश्वत शेती मुलतत्वे:

वनस्पती आणि प्राणी यापासून निर्माण होणारे अन्न पदार्थ ज्यामुळे नैसर्गिक पर्यावरण संतुलन, जन आरोग्य, मानव जातीचे कल्याण आणि पक्षी प्राणी यांचे कल्याण याचा योग्य समतोल साधून असंख्य भावी पिढी साठी नैसर्गिक स्तोत्र    ( पाणी , जमीन हवा इत्यदी) सुरक्षित राहू शकते.

पर्यावरण संवर्धन आणि समतोल: 

शाश्वत शेतीमुळे अन्न धन्य निर्मिती आणि पशुपालन वाढते  ज्यामध्ये रासायनिक घटकांचा अथवा घातक खतांचा अथवा मानव निर्मित नवीन बियाने याचा समावेश टाळला जावून जमिनीतील माती , पाणी आणि नैसर्गिक स्तोत्र यांना हानी पोह्चवणाऱ्या घटकांना टाळून योग्य प्रकारची नैसर्गिक काळजी घेतली जाईल. 

विविध प्रकारच्या अन्न धान्य निर्माण करणाऱ्या शेती मधून पिकांचे बदल करून भरपूर मोठ्या प्रमाणात जैवविविधता निर्माण होवून निरोगी नैस्रागिक अमुलाग्रता निर्माण होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणे.  

जनसामान्य आरोग्य सुरक्षिता:

कोणत्याही अन्नधान्याची निर्मिती लोकांचे आरोग्य धोक्यात आणून केली जाऊ नये. शाश्वत शेतीमुळे रासायनिक खते आणि कीटक नाशके यांचा वापर टाळला जावून योग्य प्रकारची पिके भाजीपाला आणि फळे निर्माण केली जातात कि जी आसपास परिसरात राहणाऱ्या कामगार , आणि समाजाच्या आरोग्याला खूप सुरक्षित आणि निरोगी बनवू शकतात. या शिवाय निर्माण होणारे पशु पक्षी पशुधन जे संकरीत पद्धती ऐवजी नैसर्गिक रित्या निर्माण होवून समाज आणि प्रादेशिक  उन्नती मध्ये नैसर्गिक समतोल साधून सभोवतालील पर्यावरणचा समतोल ठेवू शकते. 

शाश्वत समाज विकास :

शाश्वत शेतीमुळे आर्थिक चालना मिळून शेतकरी विकास , शेतकरी कामगार, तसेच समाज घटक साखळीमुळे अन्न धन्य निर्मिती प्रक्रिया उद्योग निर्मिती यामुळे रोजगार निर्मिती होते. यामुळे आसपास परिसरात आर्थिक जीवनमान उंचावून सामाजिक विकास प्रक्रिया गतिमान होते. 

पशुधन वाढ आणि समाजकल्याण :

शाश्वत शेतीमुळे पशुधन यामध्ये वाढ होते कारण निर्माण होणारे पिक अन्न धान्य गुरांसाठी आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल असते या शिवाय पशुधन बंधन मुक्त वातावरण मध्ये राहिल्याने त्यांचे राहणीमान नैसर्गिक रित्या होवून पशुधन निर्मिती वाढून शेतकरी बांधव यांचे आर्थिक राहणीमान उंचावून सामाजिक आणि राष्ट्रीय विकास यासाठी मोठा हातभार लागतो. याशिवाय योग्य प्रकारचे नैसर्गिक संतुलन साधून नैस्रागिक पर्यावरण समतोल वाढतो. 

शेती व्यवसाय :

खरे तर शेती व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात शेती मधून उपलब्ध होणार्या पिकावर अवलंबून आहे. जसे आपल्या देशात साखर उद्योग मोठ्या प्रमाणवर फैलावला आहे. साखर याबरोबर उपपदार्थ निर्मिती म्हणून आसवनी प्रकल्प उभे आहेत. आसवनी प्रकल्प या मधून निर्माण होत असलेल्या अल्कोहोलचा वापर खूप औषधी कारखान्यात प्रतीजैवके याशिवाय मद्यार्क निर्मिती साठी होतो. सामान्य  आणि संकरीत पशु धन यांच्या पासून निर्माण होत असलेल्या दुधासाठी खूप दुग्धव्यवसाय कारखाने आहेत.  

नगद पिके आणि व्यवसाय यासाठी असंख्य शेतकरी बांधव आपल्या शेती मध्ये पारंपारिक गोष्टी ऐवजी वाढीव उत्पादनासाठी नवीन नवीन प्रयोग करून जमीन माती, पाणी आणि हवेचे नैसर्गिक घटक बदल होतील असे प्रयोग करून सभोवतील तसेच त्या भागातील वातावरण बदल घडवत असतात. याचे दूरगामी परिणाम आपल्याला ग्लोबल वार्मिंग सारख्या घटने मध्ये बदल करून निसर्गाचे अपरिमित नुकसान करतात. 

आपल्याला भावी पिढी निरोगी आणि सक्षम बनवण्यासाठी खूप काही प्रयत्न करावे लागतील त्या मध्ये शाश्वत शेती हा एक मुख्य भाग असून आपल्याला धरती वसुंधरा अनंतकाळची माता ठेवण्यासाठी शाश्वत शेती करत पर्यावरण आणि नैसर्गिक समतोल साधने हीच खरी काळाची गरज आहे. 

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *