Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / माफसू च्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत तृतीय पारितोषिक 

माफसू च्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत तृतीय पारितोषिक 

नागपूर : रेबीज हा श्वानदंशामुळे होणारा एक प्राणघातक रोग असून जागतिक आरोग्य संस्थेच्या ( वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ) अहवालांनुसार  जागरूकतेअभावी भारतामधे दरवर्षी अंदाजे १८ ते २० हजार मृत्यू रेबीज मुळे होतात. त्यामुळे रेबीज या रोगाविषयी प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन संस्थेमार्फत राष्ट्रीय स्तरावर एक मिनिटाच्या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ अंतर्गत असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय  शिरवळ जि सातारा येथील विद्यार्थी गंगा डोडा ,चंद्रेश सोनी ,अक्षय औताडे, मोहन गवई,  विक्रम डोलताडे, महेश गट्टूवार , मयूर सिसोदिया,युवराज सूर्यवंशी आणि  अभिषेक सोळंकी यांनी निर्मित केलेल्या ‘ नको भीती – जागरूकता हवी ‘ या लघुपटास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. 

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ . आशिष पातुरकर सर्व अधिष्ठाता व संचालक तसेच महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ एस .यु दिग्रसकर यांनी सर्व पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. 

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *