Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / देवळी गुजर येथे मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

देवळी गुजर येथे मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

कर्मयोगी फाऊंडेशन व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुटीबोरी जवळील देवळी गुजर ग्राम येथे निशुल्क मोतीबिंदू तपासणी शिबिर राबविण्यात आले. या शिबिरात ७२ रुग्णांनी आपले डोळे तपासून घेतले. त्यात १७ रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे निदर्शनास आले, या सर्व रुग्णांना   लता मंगेशकर रुग्णालय नागपूर येथे निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांचा येण्याजाण्याचा, राहण्याचा व जेवणाचा सर्व खर्चही निशुल्क करण्यात येणार आहे. डॉ.  कपिल चव्हाण  यांनी या कामी आपली सेवा दिली. या कार्यक्रमाचे नियोजन कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी केले. तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता फाऊंडेशनचे संदीप हेडाऊ स्वतः उपस्थित होते तसेच देवळी ग्रामचे उपसरपंच सूर्यभानजी कुळमते, ग्रा. पं. सदस्य फकीर आडे, वासुदेव गजभिये, कर्मयोगी फाऊंडेशनचे  सरचिटणीस शिवाजीे बारेवार, संघटन प्रमुख शरद कबाडे, देविदास ठाकरे, शेषराव पारसे नितीन सोनटक्के,   कर्मयोगी फाऊंडेशनचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *