Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / * कर्मयोगी फाऊंडेशनचा* *आगळा वेगळा उपक्रम *

* कर्मयोगी फाऊंडेशनचा* *आगळा वेगळा उपक्रम *

★ *नवरात्रात नऊ दिवस जित्या जागत्या देवीची साळीचोळी देऊन  उपासना*
★ *अंजनवती ग्रामच्या ग. भा. जयश्री नितेश कुबडे यांची साळीचोळी व १०,००० रुपये आर्थिक मदत  देऊन उपासना*
बुटीबोरी : रोज रविवार म्हणजे नवरात्राचा आठवा दिवस. कर्मयोगी फाऊंडेशनने वंचित, शोषित, पिडीत गोरगरीब व समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या जित्या जागत्या देवीची उपासना करण्याचे काम या नवरात्रात बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर, कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतले आहे.  आठव्या दिवसाचा बहुमान कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे वयाच्या  विसाव्या वर्षी सौभाग्यवतीच्या, वयाच्या पंचविसाव्या वर्षी  गंगा भगवती झालेल्या अंजनवती येथील ग. भा. जयश्री नितेश कुबडे याना, त्याची साळीचोळी देऊन व दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करून उपासना करण्यात आली.


जयश्रीताईचे बीएचे  शिक्षण चालू असतानाच २०१२ मध्ये  सेलू येथील नितेश कुबडे यांच्याशी लग्न झाले. परिस्थिती गरीब असली तरी चालेल फक्त संसार आनंदात व हसत खेळत चालावा एवढीच ताईची इच्छा. परंतु नियतीला हे मंजूर नोव्हते. लग्नाच्या एक वर्षांनी ताईचे घर जळले व तेथेच ताईच्या संसाराची राख झाली. ताईला २०१३ मध्ये  रुद्र हा मुलगा व २०१४ मध्ये रेणुका  ही मुलगी झाली. आता मुलांना खूप मोठं करू व यांच्या आनंदात आपलं आयुष्य घालवू ही स्वप्ने  पहात असतानाच. नितेशरावाना दाढ दुखत असल्याने ते दाखवायला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी उपचारानंतर सांगितले की याना कॅन्सर आहे हे ऐकताच ताईच्या आंगावर आभाळ कोसळले. लगेच २०१७ मध्ये नितेशरावांनी  जगाचा निरोप घेतला. जयश्री ताईचा संसार फक्त पाच वर्षात आटोपला. ताई त्यानंतर माहेरी आल्या  इकडेही  वंडीलाचे छायाछत्र हरविले होते. आई आहे पण तीही म्हातारी, घर गळते म्हणून त्याला साळ्या बांधल्या आहेत. ताई समोर या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून कर्मयोगी फाऊंडेशने त्यांना मदतीचा आधार दिला आहे व त्यांच्या मुलाची शिक्षणाची सोय करून देण्याचा निर्धार केला आहे.


हा उपक्रम गेल्या २९ तारखेपासून चालू आहे काशीखेड, कोलार, सुकळी, आलागोंदी, बुटीबोरी, वाढोणा, देवळी, घोटी, अंजनवती व सातगांव  या गावामधील  वंचित, शोषित, पीडित, गरीब व समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या महिलांची साळीचोळी देऊन उपासना करण्यात आली. या कार्यक्रमाची सांगता कर्मयोगी फाऊंडेशनची कर्मभूमी असलेल्या ब्राम्हणी गावातील नऊ गरीब महिलांना ८/१०/१९ म्हणजे दसऱ्याच्या दिवशी साळीचोळी देऊन करण्यात येणार आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी पंकज ठाकरे, तुळशीदासजी भानारकर, शिवाजी बारेवार, विजय डोंगे, मुन्ना पटले, गणेशभाऊ सोनटक्के, प्रभाकर घोरपडे, देविदास ठाकरे, अशोक ठाकरे, वर्षा पारशे, दुर्गा सीडाम, उमेश बारेवार, रिता कुटे, आशिष उगले, संजीवनी राऊत, मुकेश कोल्हे, विनोद तितरे, मंगेश भबुतकर, राजुभाऊ निस्ताने, विशाल मोकासे.गुड्ड सोनी, शरद कबाडे, सुनील विश्वकर्मा, शेषराव पारसे, नितीन सोनटक्के, नंदकिशोर मानकर यांनी हातभर लावला. आजच्या अंजनवतीच्या कार्यक्रमाला  वरील उपस्थितासोबतच  मनीष सावळे, कपिल निहाटे,चेतन निहाटे,प्रविणभाऊ खोंडे, विशाल ठाकरे, अंजनवतीचे सरपंच विठ्ठलराव सपाटे, विनोद कुर्जेकार, दिलीप मते,प्रल्हाद कराळे,नंदुभाऊ चौधरी ,अशोकराव पवार, संजय पंचबुद्धे ,आकाश कराळे व समस्त गांवकरी मंडळी उपस्थित होती.

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *