Breaking News
Home / बातम्या / ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापनेसाठी राज्यस्तरावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास प्रथम पारितोषिक

ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापनेसाठी राज्यस्तरावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास प्रथम पारितोषिक

पुणे : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे द्वारे ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापनातील उत्कृष्टतेसाठी १६व्या राज्यस्तरीय पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले होते. ऊर्जा संवर्धन आठवड्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य MEDA, पुणे यांचेकडून राज्यस्तरीय पारितोषिकाची घोषणा करण्यात आली असता विद्यापीठ गटामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यास प्रथम पारितोषिक मिळाले.

विविध २८ गटामध्ये या पुरस्कारासाठी सादरीकरण आयोजित करण्यात आले होते.  त्यामध्ये विद्यापीठ गटामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास प्रथम पारितोषिक मिळाले. या प्रतियोगितेमध्ये विद्यापीठाकडून डॉ. सुरेंद्र काळबांडे, कुलसचिव तथा विभागप्रमुख, अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत  अभियांत्रिकी, डॉ. पंदेकृवि अकोला यांनी मा. कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे मार्गदर्शनात सादरीकरण केले.

सद्यस्तिथीत  ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचा घटक आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापनेत डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी पुढाकार घेऊन आतापर्यंत १९५ किलोवॅट ऊर्जा क्षमतेचा छतावरील वीज वाहक सोलर पी. व्ही. ऊर्जा प्रकल्प अकोला येथील विद्यापीठ परिसरात उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे २०१९-२० आर्थिक वर्षात विद्यापीठाची वीज बिलावरील वार्षिक बचत अंदाजे १७ लाख रुपये एवढी झाली. तसेच ४०० किलोवॅट ऊर्जा क्षमतेचा छतावरील वीज वाहक सोलर पी. व्ही. ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरु आहे हा प्रकल्प कार्यरत झाल्यावर या प्रकल्पाद्वारे वार्षिक बचत ४५ लाख रुपये एवढी होईल असा अंदाज आहे.

तसेच डॉ. काळबांडे यांचे मार्गदर्शनात ६ किलो वॉट बायोगॅस आधारित विद्युत निर्मिती युनिट, ३ किलो वॉट पवन -सोलर ऊर्जा हायब्रीड युनिट, ३ किलो वॉट ऑफ ग्रीड ऊर्जा निर्मिती युनिट  विद्यापीठ परिसरात कार्यन्वीत आहेत. तसेच अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागात शेतमालाच्या मूल्यवर्धनसाठी विविध सोलर टनेल ड्रायर, सोलर कॅबिनेट ड्रायर इ.  उपलब्ध आहेत.

अशाप्रकारे ऊर्जा संवर्धनास विद्यापीठ परिसरात या विविध प्रकारच्या ऊर्जा संवर्धन कामांचा लाभ झाला. प्रथम पारितोषिक डॉ. पंदेकृवि विद्यापीठास मिळाल्याने सर्वस्थरातून विद्यापीठाच्या ऊर्जा संवर्धन कामांचे कौतुक होत आहे.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *