Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / नविन कृषी पंप वीज जोडणी धोरणात शेतकऱ्यांना मिळाला लाभ

नविन कृषी पंप वीज जोडणी धोरणात शेतकऱ्यांना मिळाला लाभ

अमरावती : रोहित्रावर पर्याप्त क्षमता असलेल्या व लघूदाब वाहिनीपासून ३० मीटरपर्यंत अंतर असलेल्या परिमंडलातील शंभर टक्के शेतकऱ्यांच्या नविन कृषी पंप वीज जोडण्या फक्त १८ दिवसात कार्यान्वित करून अमरावती परिमंडलात शासन निर्णय व महावितरणचे ‘नविन कृषी पंप वीज जोडणी धोरण २०२०’ ची अंमलबजावणी मुख्य अभियंता अमरावती परिमंडल यांच्या मार्गदर्शनात धडाक्यात सुरू केली आहे.

          १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषी पंपासाठी महावितरणकडे या अगोदर कोणतीच योजना कार्यरत नसल्याने  राज्यात कृषिपंपांच्या नवीन वीज जोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास पुन्हा गती देण्यासाठी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनात नविन कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२० प्रत्यक्षात आले.

         या धोरणानुसार ज्या नविन कृषीपंपाचे अंतर लघूदाब वाहिनीच्या पोलपासून ३० मीटरच्या आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता आहे अशा सर्व ग्राहकांना एका महिन्याच्या आत वीज जोडणी देणे, लघूदाब वाहिनीपासून २०० मीटरच्या आत व रोहित्रावर पर्याप्त क्षमता शिल्लक असलेल्या नविन कृषीपंप ग्राहकांना एरीयल बंच केबलव्दारे काही अटीवर तीन महिन्याच्या आत वीज जोडणी देण्याचे, २०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या नविन ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीव्दारे व ६०० मीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या ग्राहकांना अपारंपरिक पध्दतीने सौरकृषी पंपाव्दारे वीज जोडणी देण्याचे नियोजन या धोरणात करण्यात आले आहे .

       अमरावती परिमंडलात ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या आणि नविन वीज जोडणीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये अमरावती जिल्ह्याअंतर्गत  महावितरण अचलपूर विभागातील २५,अमरावती ग्रामीण विभागातील १२४ ,मोर्शी विभागातील  ९८ आणि अमरावती शहर विभागातील ०२ अशा एकून २४९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यात महावितरणच्या यवतमाळ विभागात १२३,पुसद विभाग ११६ आणि पांढरकवढा विभागात १३८ असे एकून ३७७ शेतकऱ्यांना नविन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *