Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / सहकारी पतसंस्थाच्या सभासदांना दिवाळीपूर्वी लाभांश वाटप बाबत अडचणी दूर करा !अनिल गोतमारे.

सहकारी पतसंस्थाच्या सभासदांना दिवाळीपूर्वी लाभांश वाटप बाबत अडचणी दूर करा !अनिल गोतमारे.

नागपूर : दिनांक 14 ऑक्टोंबर 2020 च्या मंत्रिमंडळ बैठक च्या संदर्भ नुसार  पतसंस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत घेणे आवश्यक असते आणि पतसंस्था त्याचे पालन करून वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्याबरोबर सभासदांना लाभांश सुद्धा वाटप करीत असते.

परंतु covid 19 च्या प्रादुर्भावामुळे सहकारी पतसंस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मुदतवाढ केली आहे, त्यामुळे पतसंस्थांच्या सभासदांना लाभांश वाटप करता आला नाही आपल्या  मंत्रिमंडळाच्या दिनांक 14 ऑक्टोबर 2020 च्या बैठकीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील 65 कलम 75 व कलम 81 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे त्यानुसार आपण सहकारी पतसंस्थांच्या सभासदांच्या हितार्थ अध्यादेश लवकरात लवकर प्रख्यापित करावा जेणेकरून संस्थांना दिवाळीपूर्वी सभासदांना लाभांश वाटप करता येईल असे आवाहन अनिल गोतमारे जिल्हा अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर यांनी केले आहे. 

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *