मुंबई : अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्र आणि अफगाणिस्तान यांच्यात कृषी क्षेत्रातील विविध बाबींवर चर्चा झाली. या क्षेत्रातील माहिती आणि प्रशिक्षित विद्यार्थी आदान प्रदान कार्यक्रम आदी मुद्दे चर्चिले गेले. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.