Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण व ग्रामस्वच्छता अभियान

कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण व ग्रामस्वच्छता अभियान

नागपूर : कर्मयोगी फाउंडेशन ने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्ञी जयंती निमित्य आणि नवराञ उत्सव या संयुक्त शुभ पर्वावर कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या उपस्थिती मध्ये प्रभाग क्र.७ , विरसावरकर नगर व सुयोग कॉलनीमध्ये  वृक्षारोपण व स्वच्छता अभियान  करण्यात आले.

कर्मयोगी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे , कार्याध्यक्ष वर्षा पारसे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुधर्मा खोडे साहेब यांच्या उपस्थिती मध्ये  फोटोचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.. नवरात्रात कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे जित्या जागत्या वंचित, शोषित गोरगरीब, व समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या देवीची  उपासना करण्यात येत आहे. आजचा बहुमान हा आपल्या जीवनातील खडतर प्रवासावर चालताना, अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे कामगार कल्याण बुटीबोरी येथे सेवा देणाऱ्या ग,भा.नंदाताई भोयर यांची साळीचोळी देऊन उपासना करण्यात आली.  यावेळी बोलताना  पंकज ठाकरे म्हणाले ही सर्व मंडळी जी मोठी झाली ती अतिशय नम्र होती. कारण नम्रतेशीवाय ज्ञान मिळत नाही, मिळालं तर ते टिकत नाही व टिकलं तर ते शोभत नाही. म्हणून सर्वानी चांगले काम करून कर्मयोगी व्हावे असे ते म्हणाले या कार्यक्रमाला  कर्मयोगी फाऊंडेशन कोलारचे अशोक ठाकरे , शेषराव पारसे, देविदास ठाकरे , संगिता हुरपाटे , दुर्गा सिडाम , रुखमा ठाकरे,कर्मयोगी फाऊंडेशन चे कोषाध्यक्ष विजय डोंगे , नंदकिशोर मानकर , नितिन सोनटक्के, धनराज मोडक , लालचंद ठाकरे व बंधु , विठ्ठल कालसर्पे , राजु डफ,  प्रविणा ठाकरे, शितल बारेवार, रिता कुटे सविता उरकुडे , संगिता मोडक ,अर्चना निबांळकर, मेश्राम ताई, बोडकेताई, वंदना भांडेकर , जोत्सना फरकाडे, पोहुरकरताई, भावना डोंगे , श्रुती भगत , कुलवंत बाजवार , विर सावरकर मधील अनेक महिला व पुरुष उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे संचालन शरद कबाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल विश्वकर्मा यांनी केले अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व राष्ट्रवंदना घेऊन करण्यात आली.

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *