Breaking News
Home / बातम्या / महाराष्ट्रात पावसाला निरोपाला उशिर होणार 

महाराष्ट्रात पावसाला निरोपाला उशिर होणार 

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने सरासरी पेक्षा धुव्वाधार बॅटिंग केल्यावर सुद्धा वरूण राजा महाराष्ट्रावर प्रसन्न आहे. 
जून पासून सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात सरासरी १००४. २ मिलीमीटर पाऊस पडत असल्याच्या नोंदी आहेत ,परंतु यंदा पावसाने उशिरा सुरुवात करूनही सरासरी पेक्षा ३२ टक्के जास्ती म्हणजेच १३२८.५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. 
महाराष्ट्रात कोल्हापूर,सांगली आणि आता नुकतेच पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने जन – जीवन विस्कळीत केले होते तसेच पुरामुळे नागरिकांना प्राण ही गमवाव्या लागण्याच्या घटना यावर्षी घडल्या. एकीकडे पावसाने थैमान मांडले असतानाच मराठवाड्यातील बीड ,लातूर,परभणी तसेच विदर्भातील वाशीम ,यवतमाळ,गोंदिया सारख्या भागात पाऊस सरासरी पेक्षा कमी झालेला आहे. 
महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची सरासरी नोंद कोकण विभाग – १५३ टक्के तर त्या खालोखाल मध्य महाराष्ट्र १५५ टक्के इतकी नोंदविण्यात आली. 
हळुवार पावलं टाकीत आलेला मॉन्सून आता मात्र पूर्ण बरसून सुद्धा काढता पाय घेईना इतका तो महाराष्ट्राच्या प्रेमात पडलेला आहे विदर्भात एक म्हण ` पोळा झाला ` आणि पाऊस ` झाला भोळा `  म्हणजेच साधारणतः पोळा झाल्यावर पाऊस फार लांबत नाही आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात करतो परंतु आता दिवाळी सुद्धा उंबरठ्यावर आलेली असून पाऊस मात्र निरोप घेत नसून अजून प्रतीक्षा आहे त्याला निरोपाची. 

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *