Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा; हेच एक ऐतिहासिक पाऊल – आमदार देवेंद्र भुयार

दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा; हेच एक ऐतिहासिक पाऊल – आमदार देवेंद्र भुयार

मोर्शी : महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेची व्याप्ती वाढवून २०१५ ते ३० सप्टेंबर, २०२० पर्यंत थकीत मुद्दल आणि व्याजासह शेतकऱ्यांचे 2 लाख पर्यंतचे कर्ज माफ करण्याचा व 2 लाख वरील कर्जाचे समायोजन करण्याची भूमिका व नियमित कर्ज फेड करण्याऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देऊ. १ एप्रिल ते ३१ मार्च २०२१ पिक कर्ज पुनर्गठन व एक वेळा समझोता योजना, 
प्रोत्साहन पर सानुग्रह योजना 101 दिवसांमध्ये सरकारने अमलात आणून हे राज्य सरकार शेतकऱ्यांचे कष्टकरिंचे आहे असे अधोरेखित केले आहे. 

वरुड मोर्शी तालुक्यातील जमिनीतील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याकरिता मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना, दिवसाला वीज पुरवठा, अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकरीता सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, नगरपालिकांच्या विकासाकरिता, रस्त्याच्या दरजोन्नती करिता नागरी सडक योजना, मोर्शी येथे डायलिसिस केंद्र व वरुड येथे रक्त साठवण केंद्राकरिता विशेष तरतूद या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली आहे सोबतच दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा; हेच एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे मत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले .

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *