Breaking News
Home / Uncategorized / शिक्षक मतदार संघासाठी संगीता शिंदे यांची उमेदवारी जाहीर

शिक्षक मतदार संघासाठी संगीता शिंदे यांची उमेदवारी जाहीर

अमरावती : संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक संघटनेच्या झुंजार-लढाऊ नेत्या म्हणून परिचित असलेल्या संगीताताई शिंदे यंदा अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी जिंकण्याच्या निर्धारानेच सज्ज झाल्या आहेत. 

महाराष्ट्रातील प्रबळ शिक्षकांची संघटना असलेल्या शिक्षण संघर्ष संघटनेने अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी संगीता शिंदे यांच्या उमेदवारीचा ठराव एकमताने पारित करत संगीता शिंदे यांची उमेदवारी जाहिर केली आहे. कोंडेश्वर संस्थान येथे पार पडलेल्या शिक्षण संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अशोक पोले यांनी मांडलेल्या ठरावाला संघटनेच्या पाचही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी अनुमोदन देत संगीता शिंदे यांच्या उमेदवारीला समर्थन तसेच त्यांना निवडून आणण्याचा निश्चय केला.

शिक्षण संघर्ष संघटनेचा अमरावती विभागीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज कोंडेश्वर संस्थान येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या राज्याध्यक्ष संगीता शिंदे होत्या. यावेळी मुख्यध्यापक संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र कोकाटे, प्रवीण दिवे, अशोक चोपडे, घनश्याम करडे, शासकीय आश्रमशाळेचे भाऊराव गाढवे, ठाकरे साहेब, अन्वर सिद्धकी, अमरावती विभागीय अध्यक्ष प्रा.अशोक भराड, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अविनाश रोकडे, यवतमाळ जिल्हा महिलाध्यक्ष शुभांगी आवारी, वाशीम जिल्हाध्यक्ष प्रशांत कंवर, अकोला जिल्हाध्यक्ष प्रकाश हरणे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष घाटाखाली वसंत अरदळे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष गजानन तुपकर, अमरावती जिल्हाध्यक्ष गजानन बुरघाटे, शैक्षणिक सल्लागार प्रा.चंद्रशेखर म्हैसने, मार्गदर्शक नितिन गुडधे आदींसह संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सुरूवातीला कोंडेश्वर येथील महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेत संगीता शिंदे यांनी विजयाची प्रार्थना केली तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदे यांच्या विजयाचा निश्चय महादेवाच्या पिंडीसमक्ष केला.

या मेळाव्याला विभागातील सर्व ५६ तालुक्यातील तालुकाध्यक्ष तसेच अन्य शेकडो पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्याध्यक्ष शरद तिरमारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रवीण गुल्हाने यांनी केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत पुढील निवडणूकीची आखणी तसेच बैठका आणि मेळाव्यांचे आयोजनासंदर्भात चर्चा पार पडली. यावेळी प्रत्येक पदाधिकाऱ्याने किमान १०० मते जोडण्याचा निर्धार केला.प्रत्येक पदाधिकारी माझ्या कुटूंबातला
शिक्षण संघर्ष संघटनेचा परिवार संपूर्ण राज्यभरात असला तरीही या संघटनेत काम करणारा प्रत्येक पदाधिकारी माझ्या हक्काचा आणि माझ्या कुटूंबातला सदस्य आहे. ज्या लढाईसाठी आपण आता सज्ज झालो आहोत ती लढाई परिवर्तनाची लढाई असून शिक्षकांच्या मतदारसंघावर ज्या बाह्य शक्तींनी अतिक्रमण केले आहे ते मोडित काढून आपल्या शिक्षकाला आणि तुमच्या बहिणीला निवडून देण्यासाठी आणि माझे हात बळकट करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन संगीता शिंदे यांनी मेळाव्यादरम्यान बोलताना केले. तसेच विनाअनुदानित तसेच पेंशनग्रस्त शिक्षकांची व्यथा मांडत असतानाच भावूक होत संगीता शिंदे यांनी मी आमदार झाल्यास जीवाचे रान करून तुम्हाला पेंशन आणि अनुदान दिल्याशिवाय राहणार नाही असे अभिवचन देखील यावेळी बोलताना दिले.

About Editor Desk

Check Also

Centre For Science And Environment Receives The 2018 Indira Gandhi Prize For Peace, Disarmament And Development

New Delhi : Centre for Science and Environment (CSE), the New Delhi (India)-based independent research and …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *