Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महावितरणला रोप्य पदक

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महावितरणला रोप्य पदक

अमरावती :अखिल भारतीय विद्युत नियंत्रण मंडळाच्या ४२ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महावितरणच्या पुरुष संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेत महावितरणचे अष्टपैलू खेळाडू धीरज रोकडे यांना सर्वोत्कृष्ट चढाईपटू हा किताब देऊन गौरविण्यात आले. 

महानिर्मिती कंपनीच्या यजमानपदात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर येथे नुकत्याच आयोजित या स्पर्धेत संपूर्ण भारतातून  १७ संघानी आपला सहभाग नोंदवला होता. महावितरणच्या कबड्डी संघाने उपांत्यपूर्व फेरीत तामिळनाडू संघाचा ४४-१५ गुणांनी पराभव केला. तर उपांत्य फेरीत पंजाब संघाचा ५२-२३ गुणांनी प्रभाव केला. अंतिम फ़ेरीतील अतितटीच्या सामन्यात हिमाचल प्रदेश संघाकडून ३०-२७ गुणांनी महावितरणला पराभव स्वीकारावा लागला.

या संपूर्ण स्पर्धेत महावितरणच्या खेळाडूंनी नवनवीन तंत्रांचा वापर करत आपले वर्चस्व ठेवले होते. महावितरणच्या संघात किरण देवाडिगा, अजय शिंदे, धीरज रोकडे, निलेश ठाकूर, अमित जाधव, राहुल सणस, निवास गावडे, प्रमोद ढेरे, रविंद्र बिरनाळ, म्हाळू गावडे, राहुल गाढवे, सचिन कदम यांचा समावेश होता. राष्ट्रीय खेळाडू संतोष विश्वेकर यांनी संघ व्यवस्थापक म्हणून तर देवेन्द्र शिंदे यांनी प्रशिक्षक म्हणून संघाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, संचालक (वाणिज्य) सतिश चव्हाण आणि संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडीयर पवनकुमार गंजू यांनी संघाच्या या कामगिरीचे कौतूक केले आहे.

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *