Breaking News
Home / बातम्या / डॉ. पंदेकृवि चे कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान केंद्र देशामध्ये उत्कृष्ट

डॉ. पंदेकृवि चे कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान केंद्र देशामध्ये उत्कृष्ट

अकोला : अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला या संशोधन केंद्राला देशातील “उत्कृष्ट केंद्र” म्हणून राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. जबलपूर येथे नुकत्याच झालेल्या कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान च्या वार्षिक कार्यशाळेमध्ये हा पुरस्कार डॉ प्रदीप बोरकर, रिसर्च इंजिनिअर, का.प.अ.त., डॉ.पं.दे.कृ.वी, अकोला यांना प्रदान करण्यात आला.

संशोधनामध्ये चुरस निर्माण होऊन अधिकाधिक नाविन्यपूर्ण व गरजेवर आधारित संशोधन व्हावे या दृष्टिकोनातून अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या प्रकल्पामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला. यामध्ये विविध बाबिं वरती गुण ठेवण्यात आले होते जसे की वीकली रिपोर्ट, मंथली रिपोर्ट, कोर्टली रिपोर्ट सादर करण्याची तत्परता, प्रकल्प समन्वयक लुधियाना यांचे कार्यालयाला वेळोवेळी तत्परतेने दिलेले उत्तर, घेतलेले प्रोजेक्ट दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करणे, संशोधन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर  विविध निर्मात्यांशी सामंजस्य करार करून सदर यंत्र अथवा तंत्रज्ञान व्यावसायिक दृष्ट्या बाजारात उपलब्ध करून देणे, रॉयल्टी किंवा तसेच लायसन्स याद्वारे जमा झालेला निधी, विकसित तंत्रज्ञानाचे किंवा यंत्राचे पेटंट, सॅंक्शन झालेलं बजेट व त्यावरील झालेला खर्च, या बाबींवरील गुण. तसेच नवीन संशोधन प्रकल्प, चालू संशोधन प्रकल्प व पूर्ण झालेले संशोधन प्रकल्प यांची गुणवत्ता, त्याची गरज तसेच या प्रकल्पांचे यशस्वी सादरीकरण ई. बाबींवर गुण देण्यात आले. सदर परीक्षण समितीमध्ये डॉ. अन्वर आलम, Ex. DDG (Engg) व माजी कुलगुरू, रायपुर आणि जबलपूर, डॉ. इलियास, एक्स डायरेक्टर, सिफेट तसेच मा. कुलगुरू फैजाबाद, डॉ.  बी. एस. बिष्ट, माजी संचालक, सिफेट व माजी कुलगुरू, पंतनगर कृषि विद्यापीठ हे सदस्य होते. सदर पुरस्कार जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. बिसेन, उपरोक्त तीनही कुलगुरू डॉक्टर एस. एन. झा असिस्टंट डायरेक्टर जनरल डॉक्टर एस. के. त्यागी प्रकल्प समन्वयक कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान यांचे हस्ते डॉ प्रदीप बोरकर, संशोधन अभियंता, व सहकारी श्री सकलकर, बिसेन, मोहोड व धुमाळे कापअत डॉ. पंदेक्रुवी, अकोला  यांना प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातील कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या प्रकल्पाचे सर्व संशोधक जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालयाचे सर्व संचालक, अधिष्ठाता व संशोधक प्रामुख्याने उपस्थित होते

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *